crime news esakal
अहिल्यानगर

Ahmednagar Crime कोपरगाव लव्ह जिहाद प्रकरण, आरोपी मौलवीला पोलिसांनी केले गजाआड

युवती अत्याचारप्रकरणी ; मौलवीला पोलिस कोठडी

सकाळ डिजिटल टीम

कोपरगाव - शहरातील युवती अत्याचार व धर्मांतरप्रकरणी इंदूर येथील फरार आरोपी मौलवीला पोलिसांनी गजाआड केले. मौलवीला आज न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली, अशी माहिती पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली.

मौलवी मोहम्मद शोएब मोहम्मद साजिद (वय ३१, रा. गांधीनगर, इंदूर शहर, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना पकडले असून, एक आरोपी अजूनही फरार आहे.

कोपरगावच्या लव्ह जिहाद प्रकरणाची राज्यात चर्चा जोरात सुरू असून, हिंदुत्ववादी संघटनांनी २० जुलैला जन आक्रोश मोर्चा काढणार असल्याने वातावरण सध्या तापले आहे. अशातच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मोठ्या शिताफीने रविवारी दिवसभर इंदूर शहरात लपून फिरणाऱ्या मौलवीला शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भरत दाते, पोलिस कर्मचारी गणेश मैड, संभाजी शिंदे, धराडे यांच्या पथकाने इंदूर येथील तणावाची स्थिती असतानाही शिताफीने मौलवी मोहम्मद शोयब, मोहम्मद साजिद याला पकडून कोपरगाव न्यायालयासमोर हजर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: मालक समजणाऱ्यांना हटवा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणेश नाईकांवर टीका, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही !

Latest Marathi News Live Update : भाजपच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी घेतला पदभार

BMC Election: महापालिकेच्या रणांगणात जुने खेळाडू पुन्हा मैदानात! अनुभवाला की नव्या चेहर्‍यांना संधी?

Mumbai Municipal Election : निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांची खाण्यापिण्याची ऐश; कार्यकर्त्यांच्या पोटाचा मार्ग 'पक्षाच्या' तिजोरीतून!

Baramati News : बारामतीच्या उपनगराध्यक्षपदी कोणाला संधी? 16 जानेवारीला होणार निवड

SCROLL FOR NEXT