Crime esakal
अहिल्यानगर

Video : किरकोळ वादातून पेट्रोल पंप मॅनेजरची चाकून भोसकून हत्या; थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

दत्ता लवांडे

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे एका पेट्रोल पंप मॅनेजरची हत्या करण्यात आली आहे. ही घटना किरकोळ वादातून झाली असल्याची माहिती समोर आली असून या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.

अधिक माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावाच्या शिवारात ही घटना घडली असून काल रात्री तीन जण एका दुचाकीवरून पेट्रोल पंपावर आले. त्यानंतर काही वेळात त्यांचा तेथील कर्मचाऱ्याशी किरकोळ वाद झाला होता.

त्यानंतर भोजराज घनघाव हे पेट्रोल पंप मॅनेजर मध्ये पडले असता एका तरूणाने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेनंतर जखमी भोजराज यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या हल्ल्यामध्ये तेथील संतोष मोरे नावाचा कर्मचारीसुद्धा गंभीर जखमी झाला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून तपासासाठी या फुटेजचा पोलीस आधार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT