Kothe Budruk and Tangdi mobile towers in Sangamner taluka 
अहिल्यानगर

नगर जिल्ह्यातील दुर्गम भागात कनेक्‍टिव्हिटीमुळे मोबाईल खणखणू लागले

आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : सध्या मोबाईल जीवनावश्‍यक गोष्टींचा भाग झाला आहे. पावलोपावली त्याची गरज भासते. तांगडी, कोठे बुद्रुक (ता. संगमनेर) ही गावे अद्यापही या सेवेपासून वंचित होती. ही सेवा मिळावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते बजरंग तांगडकर यांच्या नेतृत्वाखाली तीन वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले. खासगी कंपनीच्या मोबाईल मनोऱ्यामुळे दुर्गम भागातील मोबाईल खणखणू लागले आहेत. 

मोबाईल सेवेत झालेल्या क्रांतीमुळे अनेक व्यवहार डिजिटल होत आहेत. त्यासाठी आवश्‍यक अँड्रॉइड मोबाईल खेड्यापाड्यांतील जनतेपर्यंत पोचले; मात्र पठार भागातील तांगडी, कोठे बुद्रुक, कोठे खुर्द, वनकुटे, भोजदरी, आंबी खालसा आदी गावे भारत संचार निगमसह खासगी कंपन्यांच्या सेवेपासून कोसो दूर होती. नैसर्गिक आपत्तीसह आजारपण आदी प्रसंगात इतरांशी संपर्क साधणे जिकिरीचे ठरत होते. या पार्श्‍वभूमीवर इंटरनेटच्या मागणीसाठी येथील तरुण सरसावले. 2017पासून पाठपुरावा सुरू होता. अखेर आज त्यात यश आले. 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई हायकोर्टाने FDA ला 'अतिरेक' केल्याबद्दल झापलं! ‘सिप्ला फार्मा’चा परवाना रद्द करण्याचा आदेश घेतला मागे

Nepal Reconstruction Cost : नेपाळवर निसर्गाचा कोप! 2015 च्या भूकंपापेक्षा पुराचा फटका भयंकर? 41,500 कोटींचे नुकसान; पुनर्बांधणीसाठी 4 ते 5 अब्जावधी डॉलर्सची गरज

Abhijit Dipke: ‘अधिकाऱ्यांची मुले एसी शाळेत, सामान्यांची मुले खराब वर्गखोल्यांत’; अभिजित दीपकेंचा घणाघात

शाळेत जाण्याची तयारी करत होता, वडील स्वयंपाक करत होते... अचानक पुराचा रौद्र प्रवाह आला; वाहून गेलेल्या बाबांना शोधण्यासाठी ११ वर्षांच्या मुलाची धडपड

OBC Reservation: जरांगे-ओबीसी आरक्षणावरून लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल; ‘भाजपने रेड कार्पेट टाकले तर संपेल’

SCROLL FOR NEXT