Akash Chavan Success Story : जिद्दीला सलाम! लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले, बालग्राममध्ये झाला मोठा; दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास करून 'हा' पठ्ठ्या बनला थेट लेखापाल

Akash Chavan success story : लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या आकाश चव्हाणने बालग्रामच्या आधारावर शिक्षण पूर्ण केले. दिवसा नोकरी आणि रात्री अभ्यास करत त्याने नवी मुंबई महापालिकेत लेखापालपद मिळवले.
Akash Chavan Success Story

Akash Chavan Success Story

esakal

Updated on: 

पन्हाळा : लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. प्रतिकूल परिस्थितीत बालग्रामचा आधार मिळाला. मात्र, परिस्थितीपुढे हार न मानता जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर आकाश चव्हाण याने यशाला गवसणी घातली. बालग्राम पुणे आणि पन्हाळा येथे वाढलेल्या आकाशची नवी मुंबई महापालिकेत लेखापालपदी निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे दिलीपसिंहराजे घाटगे बालग्राम परिवारात आनंदाचे वातावरण (Akash Chavan accountant recruitment) आहे.

Loading content, please wait...