Kumshet Road Condition sakal
अहिल्यानगर

Development : आम्हाला जिल्हा बदलून द्या! सुविधांअभावी कुमशेतकरांची मागणी

अकोले तालुक्यातील कुमशेत गावात ना तलाठी ना ग्रामसेवक. त्यामुळे तेथील विकास कामे ठप्प झाली आहेत.

शांताराम काळे

अकोले तालुक्यातील कुमशेत गावात ना तलाठी ना ग्रामसेवक. त्यामुळे तेथील विकास कामे ठप्प झाली आहेत.

अकोले - तालुक्यातील कुमशेत गावात ना तलाठी ना ग्रामसेवक. त्यामुळे तेथील विकास कामे ठप्प झाली आहेत. शासनाच्या कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नसल्याने जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गावातील ग्रामस्थांकडून आमच्या गावाचा पुणे नाहीतर ठाणे जिल्ह्यात समावेश करावा, अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अकोले तालुक्यातील अतिदुर्गम व जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या कुमशेत व तेथील सात वाड्या मागील दोन वर्षांपासून ग्रामसेवकांच्या संगीत खुर्चीमुळे वैतागल्या असून, स्थानिक रहिवासी दाखला, विद्यार्थ्यांना लागणारे शालेय दाखले मिळणे अशक्य झाले आहे. हे गाव पेसा अंतर्गत असून, निधीची कमतरता नाही. मात्र तो खर्च करण्यासाठी ग्रामसेवक नसल्यामुळे विकासकामे रखडली आहेत.

गावातील रस्ते, गटारे, जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती, विजेचा प्रश्न प्रलंबित असून, गावाला सरपंच, सदस्य आहेत. पण सरकारी दप्तर लिहिण्यासाठी व बँकेतून पैसे काढण्यासाठी ग्रामसेवक नाही.

यापूर्वी एका महिला ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी रस्ता व इतर अडचणी पाहून तेथून काढता पाय घेतला. मागील दोन वर्षांपासून ही स्थिती आहे. ग्रामसेवक नाही. त्यातच तलाठी देखील आठवड्यातून एखादा दिवस आला तर येतो, नाही तर ग्रामस्थांना त्याला शोधण्यासाठी तालुक्याच्या गावाला जावे लागते. ठाणे व पुणे जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या या गावातील ग्रामस्थांचे विकास कामे होत नसतील, तर आम्हाला ठाणे किंवा पुणे जिल्ह्यात वर्ग करा. मोबाईल लागत नाही, रस्ता खराब झाला, स्वस्त धान्य वेळेवर मिळत नाही, वीज काही वाड्यांमध्ये पोहचली नाही. त्यामुळे विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरपंच सयाजी अस्वले, संतू अस्वले, बाबूराव धिंदळे, उपसरपंच गोविंद मधे, ज्ञानेश्वर अस्वले, गोविंद धिंदळे, वनिता बारामते, चिंधाबाई अस्वले, रंजना अस्वले, वेणूबाई अस्वले, ढवळा अस्वले आपल्या व्यथा गटविकास अधिकाऱ्यांकडे मांडल्या.

गेल्या वर्षभरापासून ग्रामसेवक नसल्याने आट्यापाट्याचा खेळ सुरू आहे. तलाठी आठवड्यातून एक दिवस येतात. त्यामुळे गावातील विकासकामांना खीळ बसली आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून आमचा प्रश्न मार्गी लावावा.

- सयाजी अस्वले, सरपंच, कुमशेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : भारतीयांनो परत जा म्हणत भारतीय महिलेवर अत्याचार; 'या' देशात घडलेल्या घटनेने जग हादरले, हल्लेखोर थेट घरात घुसले अन्…

Latest Marathi News Live Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला

ठरलं! ‘कांतारा चॅप्टर 1’ वीकेंडला OTT प्लॅटफॉर्मवर करणार एन्ट्री, तारिख जाणून घ्या!

B Pharmacy: बी फार्मसी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर; ६ हजार ९२१ विद्यार्थ्यांना जागा मिळाली

ऐकावं ते नवलंच! तब्बल १२ दिवस चाललेला कसोटी सामना, शेवटी एका संघाला परतीची बोट पकडायची होती म्हणून मॅच थांबली अन्यथा...

SCROLL FOR NEXT