Ladki Bahin Yojana  sakal
अहिल्यानगर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे बँकेत हेलपाटे,साडेअकरा लाख महिला पात्र : तिसऱ्या हप्‍त्याच्या प्रतीक्षेत

Ladki Bahin Yojana : महिला बँक खात्यात तिसऱ्या हप्त्यासाठी आतुर आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ११ लाख ४१ हजार महिलांनी पात्रता मिळवली असून, आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचे तिसऱ्या हप्त्याकडे डोळे लागले आहेत. त्यासाठी त्यांचे दररोज बँकांमध्ये हेलपाटे सुरू आहेत. आज-उद्या हप्ता बँकेत वर्ग होईल, अशी आवई उठल्याने महिला भगिनी बँकेत, तसेच संबंधितांकडे विचारपूस करीत आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत आतापर्यंत ११ लाख ६६ हजार महिलांनी नोंदणी केली आहे. त्यात ११ लाख ४१ हजार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. तब्बल ९८ टक्के महिला पात्र ठरल्या आहेत. उर्वरित दोन टक्के महिला पात्रतेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील काहीजणींचे प्रस्ताव कायमस्वरूपी नाकारले आहेत. काहीजणींच्या प्रकरणात त्रुटी असल्याने ते पेंडिंग आहेत. त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली, तर ते स्वीकारले जाऊ शकतात, असे महिला बालकल्याण विभागाचे प्रकल्प अधिकारी मनोज ससे यांनी सांगितले.

जिल्ह्यात आजअखेर ॲपद्वारे ७ लाख ८ हजार ८२१, पोर्टलद्वारे ४ लाख ५८ हजार ५४, असे एकूण ११ लाख ६६ हजार ८५७ अर्ज आले आहेत. ॲपवरील ५६३, पोर्टलवरील ९ हजार २०, असे एकूण ९ हजार प्रकरणे ५८३ पेडिंग आहेत. ११ लाख ४३ हजार ६९ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. हे शेकडा ९७.९६ टक्के प्रमाण आहे.

तारीख पे तारीख

सप्टेंबर महिन्याच्या एक तारखेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर १५ तारखेची चर्चा सुरू झाली. योजनेबाबत रोज नवनव्या बातम्या सोशल मीडियात व्हायरल होत असल्याने लाडक्या बहिणी गांगरून गेल्या आहेत. काहींचा अजून पहिलाच हप्ता आला नसल्याने संभ्रम आहे. त्यांना सलग तीन हप्त्यांची प्रतीक्षा आहे. या आठवड्यात या योजनेतील तिसरा दीड हजारांचा हप्ता बँक खात्यात वर्ग होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पात्र लाभार्थींची संख्या (नवीन-जुने पोर्टल)

  • अकोले......... ३०७७४.........४४८०१

  • संगमनेर......... ४२४४०......... ८७९६५

  • कोपरगाव .........३३६६६......... ४२०८५

  • श्रीरामपूर .........२६८५७ .........४६०५३

  • नेवासे ......... ३३८२......... ६०२१९

  • शेवगाव .........२१७९४......... ३८२३८

  • पाथर्डी .........२७६३५.........३५३१६

  • जामखेड .........१३९४९......... २७५४१

  • कर्जत .........२२१६......... ३८०८३

  • श्रीगोंदे .........३२८२०......... ४५६८७

  • पारनेर .........२४१३०......... ४४३०६

  • नगर .........६८६९८ .........५५६४६

  • राहुरी .........३०३९१......... ५४०३२

  • राहाता .........२९८३४......... ८४११९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT