Landless people will get five acres of land 
अहिल्यानगर

तुम्हाला जमीन नाही ना? ही बातमी आहे फायद्याची, मोदी सरकार देणार पाच एकर शेती

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः देशातील भूमिहिनांना पाच एकर जमीन देण्याचा निर्णय दिल्लीतील बैठकीत घेण्यात आला. सरकारची देशात 20 कोटी एकर जमीन मोकळी आहे. त्यातून चार कोटी कुटुंबांना लाभ मिळेल. रिपब्लिकन पक्षातर्फे 25 फेब्रुवारीला देशभर भूमिमुक्ती आंदोलन करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केले. 

पत्रकारांशी बोलताना मंत्री आठवले म्हणाले, की देशात 1957 नंतर "कसेल त्याची जमीन' हा कायदा झाला. मात्र, ज्यांना जमीनच नाही, त्यांचे काय? आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली होती. त्यावेळी देशात लाखो एकर जमीन मोकळी झाली होती. मात्र, ती जमीन कोणाला वाटप केली, याची चौकशी करण्याची आमची मागणी आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस खराब होत आहे. पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास निःपक्ष व्हावा, असे ते म्हणाले. 

राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, दीपक गायकवाड, श्रावण वाघमारे, कैलास शेजवळ, सुरेंद्र थोरात, सुनील साळवे, रमेश गायकवाड आदी उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT