Ahmednagar  
अहिल्यानगर

Ahmednagar : नगर जिल्ह्यातील लंगर सेवा डेन्मार्कच्या मानांकन यादीत; जगभरातून ऑनलाइन व्होटींग

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जगात जल, वायू, अन्न या क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्यांना कोपनहेगन (डेन्मार्क) येथून डब्ल्यू.ए.एफ.ए. संस्था आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करते. या पुरस्काराच्या मानांकन यादीत अहमदनगर शहरातील गुरू अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवा पोचली आहे. यावर्षीची पुरस्कारार्थी संस्था ठरविण्यासाठी जगभरातून ऑनलाइन व्होटिंग सुरू आहे.

लंगर सेवेच्या सामाजिक कार्यास मतदान (व्होटींग) करण्याचे आवाहन गुरू अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. डेन्मार्क येथून मागील अकरा वर्षांपासून जल, वायू, अन्न या क्षेत्रात सामाजिक योगदान देणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरू झालेल्या लंगर सेवेने तब्बल तीन वर्षे भुकेलेल्यां लाखो लोकांना दोन वेळचे निःशुल्क जेवण पुरविण्याचे कार्य केले. आजही लंगर सेवेची अन्नछत्रालये सुरू आहेत. या सामाजिक कार्याची दखल घेऊन पुरस्काराच्या निवड समितीने लंगर सेवेला अन्न श्रेणीत अंतिम पुरस्कारार्थींच्या यादीत स्थान दिले आहे.

डब्ल्यू.ए.एफ.ए. संस्था जगभरातील पाणी, हवा आणि अन्न सुरक्षेसाठी कार्य करणार्‍यांना पुरस्काराने सन्मानित करत असते. 2.7 अब्ज लोक दारिद्र्यरेषेखाली राहतात, 850 दशलक्ष लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. 828 दशलक्ष कुपोषित आहेत.

या वर्षी अन्न श्रेणीत केनिया, भारत, झांबिया, नायजेरिया या चार देशांतील संस्था आहेत. यामध्ये घर घर लंगर सेवा भारतातून निवडण्यात आली आहे. कोरोना काळात लंगर सेवेचे कार्य व योगदानाने डब्ल्यू,ए.एफ.ए. प्रभावित झाली. हे कार्य इतरांसाठी आशेचा संदेश ठरणार आहे. घर घर लंगर सेवेला व्होटिंग करण्यासाठी https://wafa.awardsplatform.com/entry/vote/kWYEeEaA ही लिंक देण्यात आली आहे. यात्यावर जाऊन लंगर सेवेला व्होटिंगचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT