Laxman Jagtap of Shiv Sena as the Deputy Mayor of Newasha 
अहिल्यानगर

नेवाशातही शिवसेनेने भाजपला लोळवले, उपनगराध्यक्षपदी जगताप

सुनील गर्जे

नेवासे : नेवाशाच्या उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक लक्ष्मण जगताप विजयी झाले. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपच्या दोन नगरसेविका अनुपस्थित राहिल्या. नगर पंचायतीत भाजपकडे सात नगरसेवक आहेत. त्यांना काँग्रेसच्या एका उमेदवाराने मतदान केले. परंतु त्यांच्या उमेदवारावा पराभवास सामोरे जावे लागले. 

नेवासे नगरपंचायतीच्या सभागृहात आज ऑनलाइन पद्धतीने झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना प्रभारी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सहकार्य केले. 

नेवासे नगर पंचायतीत शिवसेनेकडे (पूर्वीचा क्रांतिकारी पक्ष) ९, भाजपकडे ७ तर काँग्रेसचा एक नगरसेवक आहे. शिवसेनेचे गटनेते लक्ष्मण जगताप यांना स्वतःसह नगराध्यक्ष योगिता पिंपळे, मावळते उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, अर्चना जितेंद्र कुऱ्हे, सचिन वडागळे, अंबिका इरले, संदीप बेहळे, फिरोजबी पठाण, फारुक आतार यांचे मतदान झाले. 

भाजपचे उमेदवार गटनेते सचिन नागपुरे यांना स्वतःसह नगरसेविका शालिनी सुखधान, अनिता डोकडे, डॉ. निर्मला सांगळे, रणजित सोनवणे, दिनेश व्यवहारे अशी सहाच मते मिळाली. या वेळी भाजपच्या सीमा मापारी, माजी नगराध्यक्ष संगीता बर्डे अनुपस्थित होत्या. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

Electronics Prices: दसरा-दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा धक्का; एसी, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिनच्या किमती वाढणार

Kolhapur Politics: ठरावदारांच्या ओळख परेडवरून राडा; मंत्र्यांसमोरच वादावादी; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते धावले अंगावर

ST Bus: विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार! दुर्गम भागात एसटीच्या १०० 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' मिडी बस धावणार

Kolhapur News: माझ्यासाठी भरपूर केलंस, माफ कर’, पत्नीला मेसेज पाठवून संपवलं आयुष्य; सावकाराकडून जाच

SCROLL FOR NEXT