Lead of Ambalika factory in sugarcane crushing 
अहिल्यानगर

ऊस गाळपात अंबालिका कारखान्याची आघाडी, नागवडेचा उतार भारी

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्ह्यातील 13 सहकारी व आठ खासगी साखर कारखान्यांचे गाळप सुरु झाले आहे. आजअखेर सर्व कारखान्यांचे 56 लाख 35 हजार 30 टन उसाचे गाळप झाले असून, त्यात अंबालिका कारखान्याने आघाडी घेतली आहे. साखर उताऱ्यात नागवडे कारखाना जिल्ह्यात अव्वल आहे. 

जिल्ह्यात सहकारी व खासगी एकूण 23 कारखाने आहेत. त्यातील साईकृपा-दोन व तनपुरे सहकारी साखर कारखाना सध्या बंद आहे. जिल्ह्यातील 13 सहकारी कारखान्यांनी 37 लाख दोन हजार 365, तर आठ खासगी कारखान्यांनी 19 लाख 32 हजार 665 मेट्रिक टन, असे एकूण 56 लाख 35 हजार 30 टन उसाचे गाळप केले आहे.

आजअखेर एकूण 49 लाख 240 क्विंटल साखर तयार झाली आहे. त्यात अंबालिका कारखान्याने सहा लाख 83 हजार 475 टन गाळप केले असून, सहा लाख 26 हजार 900 क्‍विंटल साखर तयार करून जिल्ह्यात आघाडी कायम ठेवलेली आहे.

त्याखालोखाल ज्ञानेश्‍वर कारखान्याने पाच लाख सात हजार 270 टन उसाचे गाळप करून चार लाख 70 हजार 950 क्विंटल साखर तयार केली आहे. तिसऱ्या स्थानी भाऊसाहेब थोरात कारखाना असून, त्यांनी चार लाख 84 हजार 150 टन उसाचे गाळप करून, चार लाख 24 हजार 260 क्विंटल साखर केली आहे. 

अंबालिकाची आघाडी 
अंबालिका कारखान्याने ऊस गाळपात आघाडी घेतली असली, तरी साखर उताऱ्यात नागवडे कारखाना आघाडीवर आहे. नागवडे कारखान्याचा साखर उतारा 10.11 आहे. त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर साईकृपा-एक असून, साखर उतारा 9.79 आहे. 

अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांसाठी मोठी संधी; लघु उद्योगांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी लोकल उशिराने धावणार, 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन?

Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! कोयना धरणात 97 टीएमसी पाणीसाठा; सांगली-सातारा अन् कर्नाटकाची चिंता मिटली

IND vs SL: भारत खेळणार 600वा कसोटी सामना; ‘या’ दोन संघांनंतर ऐतिहासिक क्लबमध्ये होणार एंट्री, कोणत्या देशाने खेळले 1000हून अधिक सामने!

Vishwas Nangare Patil: विश्‍वास नांगरे पाटील यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, रेड्डींसह दहा पोलिस होणार सन्मानित

SCROLL FOR NEXT