Leaders in Nagar District Bank withdraw from elections
Leaders in Nagar District Bank withdraw from elections 
अहमदनगर

नगर जिल्हा बँकेत ऐनवेळी कोणी घेतली कोणासाठी माघार

दौलत झावरे

नगर ः जिल्हा बॅंकेच्या 21 जागांसाठी 198 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यांतील 173 जणांनी अर्ज मागे घेतल्याने 17 जागा बिनविरोध झाल्या आहेत. यातील दोन जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. अर्जमाघारीमध्ये 15 जागा बिनविरोध झाल्या आहेत. 

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील मातब्बरांसह अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, ज्येष्ठ नेत्यांसह मान्यवरांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे 198 इच्छुकांमधील 173 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले.

आता चार जागांसाठी आठ जण निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. सेवा संस्था मतदारसंघातील चंद्रशेखर घुले व अण्णासाहेब म्हस्के बिनविरोध झाले आहेत. अर्जमाघारीत 15 जण बिनविरोध झाले. 

बिनविरोध झालेल्या संचालकांसाठी कोणाची माघार? 

सेवा संस्था मतदारसंघ ः 
अकोले ः
सीताराम गायकर बिनविरोध निवडून आले असून त्यांच्यासाठी सुरेश गडाख व दशरथ सावंत यांनी अर्ज मागे घेतला. 
जामखेड ः अमोल राळेभात यांच्यासाठी जगन्नाथ राळेभात व सुरेश भोसले यांनी अर्ज मागे घेतले. 
कोपरगाव ः विवेक कोल्हे यांच्यासाठी बिपीन कोल्हे, देवेंद्र रोहमारे, किसनराव पाडेकर, अलकादेवी जाधव यांनी माघार घेतली. 
नेवासे ः मंत्री शंकरराव गडाख यांच्यासाठी शिवाजीराव शिंदे, कारभारी जावळे, रत्नमाला लंघे यांनी माघार घेतली. 
पाथर्डी ः आमदार मोनिका राजळे यांच्यासाठी मथुराबाई वाघ यांनी माघार घेतली. 
राहुरी ः अरुण तनपुरे यांच्यासाठी सुरेश बनकर, तानाजी धसाळ, सत्यजित कदम, सुभाष पाटील, नामदेव ढोकणे, मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली. 
संगमनेर ः माधवराव कानवडे यांच्यासाठी दिलीप वर्पे, रंगनाथ फापाळे, रमेश मगर, दिनकर गायकवाड यांनी माघार घेतली. 
श्रीगोंदे ः राहुल जगताप यांच्यासाठी राजेंद्र नागवडे, वैभव पाचपुते व प्रणोती जगताप यांनी माघार घेतली. 
श्रीरामपूर ः भानुदास मुरकुटे यांच्यासाठी करण ससाणे, दीपक पटारे व कोंडिराम उंडे यांनी माघार घेतली. 

शेतीपूरक, शेती मालप्रक्रिया व पणन मतदारसंघ ः आमदार आशुतोष काळे यांच्यासाठी गणपतराव सांगळे, माधवराव कानवडे, वैभव पिचड, दादासाहेब सोनमाळी, सुभाष गुंजाळ, मधुकर नवले, भानुदास मुरकुटे, रोहिदास कर्डिले, रावसाहेब शेळके, तानाजी धसाळ, सुरेश पठारे, राजेंद्र नागवडे, केशव भवर, उत्तमराव चरमळ, संभाजी रोहोकले, अरुणराव येवले, संभाजीराव गावंड, इंद्रनाथ थोरात, रावसाहेब म्हस्के, सुधीर म्हस्के, दत्तात्रय पानसरे, रावसाहेब डुबे, विक्रम देशमुख, रामचंद्र मांडगे, राहुल जगताप, राजेश परजणे यांनी माघार घेतली. 

विशेष मागास मतदारसंघ ः गणपतराव सांगळे यांच्यासाठी दहा जणांनी माघार घेतली. 

महिला प्रतिनिधी मतदारसंघ ः आशा तापकीर व अनुराधा नागवडे यांच्यासाठी 26 महिला उमेदवारांनी माघार घेतली. 

इतर मागासवर्ग मतदारसंघ ः करण ससाणे यांच्यासाठी एकूण 32 जणांनी माघार घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT