बालिकाश्रम रस्ता परिसरातही एलईडी sakal
अहिल्यानगर

बालिकाश्रम रस्ता परिसरातही एलईडी

बालिकाश्रम रस्ता परिसरामध्ये मनपाच्या वतीने स्मार्ट एलईडी पथदिवे बसवण्याच्या कामाची पाहणी मनपा महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे यांनी केली

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शालेय विद्यार्थी, शिकवणीवर्ग, महाविद्यालये, असा गजबजलेला भाग असलेल्या बालिकाश्रम रस्ता परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पथदिव्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत नुकतेच महापौर रोहिणी शेंडगे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर तातडीने महापालिका प्रशासनाने स्मार्ट एलईडी दिवे बसविण्याचे काम सुरू केले आहे. प्रभागाचा विकास हाच अजेंडा असल्याची माहिती महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे यांनी दिली.

बालिकाश्रम रस्ता परिसरामध्ये मनपाच्या वतीने स्मार्ट एलईडी पथदिवे बसवण्याच्या कामाची पाहणी मनपा महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे यांनी केली. सभापती बोरुडे म्हणाल्या, की हा नगर शहराचा मुख्य भाग आहे. मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झाल्या असून, दाट लोकवस्ती आहे. या भागातून मोठी रहदारी व वाहतूक होते.

शालेय विद्यार्थ्यांचे शिकवणीवर्ग, वसतिगृह व महाविद्यालय या भागामध्ये आहे. या परिसरामध्ये अनेक दिवसांपासून पथदिवे बंद होते. त्यामुळे नागरिकांना अंधाराला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांच्या विविध समस्या निर्माण झाल्या होत्या. महापौर शेंडगे यांच्याकडे पथदिवे बसविण्याची मागणी केल्यानंतर मनपाच्या वतीने आज तातडीने स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. प्रभागातील इतर कॉलनींमधील पथदिवे बसविण्याच्या कामाला सुरवात होऊन संपूर्ण प्रभाग लवकरच प्रकाशमय होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT