https://www.esakal.com/ahmednagar/mla-rohit-pawar-said-he-proud-youth-who-have-joined-army-karjat-jamkhed-380457
https://www.esakal.com/ahmednagar/mla-rohit-pawar-said-he-proud-youth-who-have-joined-army-karjat-jamkhed-380457 
अहमदनगर

साई संस्थानच्या विश्वस्त मंडळात स्थानिकांना संधी हवी

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी ः सरकारी व निमसरकारी समित्यांवर तातडीने नियुक्‍त्या कराव्यात, तसेच साईसंस्थानच्या नियोजित विश्वस्त मंडळात निम्मी संख्या स्थानिकांची असावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर व माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. 

मंत्री मुश्रीफ यांनी आज येथे येऊन साईदर्शन घेतले. संदीप वर्पे, राजेंद्र फाळके, सुधाकर शिंदे, महेंद्र शेळके, अमित शेळके, संदीप सोनावणे, दीपक गोंदकर आदी उपस्थित होते. 

जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, साईसंस्थानसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या देवस्थानावर विश्वस्त मंडळ नियुक्त केलेले नाही. त्यामुळे दैनंदिन कामकाज करताना अडचणी येतात.

साईसंस्थान कामगारांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. विकासकामांना गती द्यायची आहे. भाविकांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी, त्यांना सुलभ साईदर्शन घेता यावे, यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांना साईसंस्थानच्या विश्वस्तपदी संधी मिळणे गरजेचे आहे. विविध सरकारी समित्या व मंडळांवर संधी मिळाल्यास कार्यकर्त्यांना बळ मिळेल. पक्षसंघटन मजबूत करण्यास मदत होईल, अशी मागणी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT