Lockdown in Dongargan village due to Corona patient
Lockdown in Dongargan village due to Corona patient 
अहमदनगर

डोंगरगणमध्ये लाॅकडाऊन... सर्व व्यवहार ठप्प... पर्यटकांनाही मज्जाव 

दत्ता इंगळे

नगर तालुका : डोंगरगण (ता. नगर) येथे एक कोरोना रुग्ण आढळल्याने संपूर्ण गावच बंद करण्यात आले आहे. गावातील रस्ते, दुकाने, सलूनसह अत्यावश्‍यक सेवेचीही दुकाने बंद करण्यात आली असून, कोरोना रुग्ण संपर्कात आलेल्या 15 जणांना क्‍वारंटाईन करण्यासाठी नगरला पाठविले आहे. 

डोंगरगण परिसरात नेहमीच पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होत असते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरपंच कैलास पटारे यांनी पर्यटकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे गर्दी काही अंशी कमी झाली होती.

अशात डोंगरगणमध्ये एक कोरोनाबाधित आढळल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या 15 जणांची आरोग्य विभागाने तपासणी करून त्यांच्या घशातील स्राव घेतले आहेत. त्यांना क्‍वारंटाईन करण्यासाठी नगरला पाठविले आहे. त्यांचा अहवाल अद्याप आलेला नसला, तरी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. 


डोंगरगण गावासह शिवारातील घाटात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. तसेच शहरातील तरुणाई व्यायामासाठी व फिरण्यासाठी या परिसरात येत असते. त्यांना आता यापुढे येथे येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटक व भाविकांनी डोंगरगणला येऊ नये. 
- कैलास पटारे, सरपंच, डोंगरगण 

 

संपादन ः दौलत झावरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Chinmay Mandlekar: "मला वाटलं ते मुस्काटात मारतील..."; चिन्मय मांडलेकरनं सांगितला रजनीकांत यांच्या भेटीचा किस्सा

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT