Look at what the bride and groom did, the eighth round of the wedding 
अहिल्यानगर

बघा या वधू-वरांनी काय केलं, लग्नात घेतला आठवा फेरा; कारण समजलं तर तुम्हालाही वाटेल कौतुक

सकाळ वृत्तसेवा

नगर : हल्ली पाण्यात लग्न, आकाशात लग्न असे विविध प्रकारची स्टंटबाजी केली जाते. मात्र, नगर जिल्ह्यातील पाच वधू-वरांनी वेगळ्याच पद्धतीने लग्न केलं. त्यांनी लग्न करताना सात नव्हे तर आठ फेरे घेतले. नेमके कोणत्या कारणासाठी त्यांनी असं केलं. याचं कारण समजलं तर तुम्हालाही त्यांचे कौतुक वाटेल.

विवाह सोहळ्यात वधू-वरांनी "आठवा फेरा स्री-जन्माच्या स्वागताचा' घेतल्याची माहिती स्री-जन्माचे स्वागत करा चळवळीच्या प्रणेत्या डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली.

संगमनेर येथील दत्ता कासार, पारनेर येथील गोरखनाथ शिंदे व श्रीगोंदे येथील नवनाथ वाघमारे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविला. चित्त परिवारातील डॉ. पूजा आणि चव्हाण परिवारातील हिमांशू, तसेच रुकारी परिवारातील सचिन व कोटकर परिवारातील सोनाली यांचा विवाह संगमनेर येथे झाला.

वाघमारे परिवारातील भारत व शिरवाळे कुटुंबातील नीता यांचा विवाह श्रीगोंदे येथे झाले. शिंदे परिवारातील अवधूत व जाधव परिवारातील मोनाली आणि शिंदे परिवारातील गायत्री, तसेच रणदिवे परिवारातील सूरज यांचा विवाह सुपे येथे झाला.

या पाचही विवाह सोहळ्यात आठवा फेरा स्त्री-जन्माच्या स्वागताचा घेण्यात आला. बेटी बचाओ चळवळीच्या राष्ट्रीय प्रणेत्या डॉ. सुधा कांकरिया यांनी वऱ्हाडींना शुभेच्छा दिल्या. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT