Lumpy Virus esakal
अहिल्यानगर

Ahmednagar : लम्‍पी आजाराला शेतकऱ्यांनी घाबरून नये : झावरे पाटील

महाराष्ट्र सरकारने लंपी आजाराची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली

सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर : महाराष्ट्र सरकारने लंपी आजाराची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. लंपी आजाराला शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी केले.

सारोळा आडवाई (ता. पारनेर) येथे पशू संवर्धन विभागामार्फत जनावरांच्या लसीकरण मोहीमेस प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. उद्योजक संदीप कपाळे, सोपान मुंजाळ, शंकर महांडूळे, सतीश महांडूळे, सुरेश फंड, काशिनाथ फंड, भाऊसाहेब महांडूळे, शोभा फंड, उत्तम फंड, सुनिल शिंदे, अरुण फंड, पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड उपस्थित होते.

झावरे म्हणाले, की राज्यात सगळीकडे गाय व बैलांमध्ये लंपी आजाराची लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये जनावरांना या रोगाची लागण झाली आहे. राज्याचे पशूसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन याबाबत तालुक्यातील या गावांमध्ये जनावरांचे लसीकरण करण्याची मागणी केली होती. पशूधन वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Nanded Crime: डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणे भोवले! वाई बाजारच्या पूजा मेडिकल्स परवाना निलंबित; सहाय्यक आयुक्तांची कारवाई!

Success Story: मोलमजुरी करणाऱ्या आईचा मुलगा आयआयटीत; पारनेरच्या संतोष पागिरेंची गरुड झेप, लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले!

"फिटनेसच्या बाबतीत माझा रोल मॉडेल कुशल बद्रिके! देवदत्तने सांगितले ‘घबाडकुंड’ च्या सेटवरचे मजेशीर अनुभव

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT