Maharaj of Shrirampur went to Corona 
अहिल्यानगर

श्रीरामपूरचे महाराज निघाले कोरोनाबाधित...आता भक्तांची सुरू आहे धावपळ

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः औरंगाबाद येथून वडाळा महादेवला आलेल्या रूग्णाचा  अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. ते एका पंथातील महाराज आहेत. धार्मिक शिक्षणासाठी अौरंगाबादला होते. त्यांच्या संपर्कातील श्रीगोंद्यातील खासगी डॉक्‍टरसह अन्य दोघांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले आहे. तसेच, काल (ता. 23) धारावी (मुंबई) येथून आलेल्या दोघांच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.

औरंगाबाद येथून 20 मे रोजी ते वडाळा महादेव आले होते. त्रास जाणवू लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमधडे यांनी त्यांना नगरला पाठविले. मात्र, तत्पूर्वी ते शहरातील खासगी रुग्णालयात गेली होते. नगरला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून घशातील स्राव घेण्याची गरज नसल्याचे सांगितले. त्यामुळे ते श्रीगोंदे येथील खासगी डॉक्‍टरकडे गेले. तेथे एक दिवस उपचार घेतल्यावर तेथील डॉक्‍टर या महाराजांना काल (शनिवारी) पुन्हा नगर येथील जिल्हा रुग्णालयात घेऊन आले. त्या वेळी त्याच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेतले. त्याचा अहवाल आज "पॉझिटिव्ह' आला.

सध्या या व्यक्तीस बूथ रुग्णालयात हलविले आहे. दरम्यान, बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आता सुरू आहे. थेट संपर्कात आलेल्या दोघांसह श्रीगोंदे येथील डॉक्‍टरला तपासणीसाठी नगरला पाठविले आहे. काल (ता. 23) धारावी (मुंबई) येथून आलेल्या व वडाळा महादेव येथे क्वारंटाईन केलेल्या दोघांमध्ये लक्षणे आढळल्याने त्यांना नगरला हलविले आहे. त्यांचा अहवाल आलेला नाही. त्यातच काल (शनिवारी) अशोकनगर येथे एकाच दिवशी 36 जण मुंबईतून आले आहेत. त्यांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन केले आहे. मुंबई, औरंगाबाद, पुणे येथून अनेक जण श्रीरामपुरात येत आहेत. सध्या एक हजार व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT