अहिल्यानगर

MPKV Bird Census: जिकडे तिकडे पक्ष्यांचा किलबिलाट! महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात पक्ष्यांच्या संख्येत वाढ

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेतर्फे कृषी विद्यापीठ परिसरात पक्षी गणना करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

Mahatma Phule Krushi Vidyapith Birds Counting: सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेतर्फे कृषी विद्यापीठ परिसरात पक्षी गणना करण्यात आली. पक्षी गणनेचे यंदाचे दहावे वर्ष होते. यंदा ४१७१ पक्षी आढळले. मागील वर्षीच्या तुलनेत १०१३ पक्षी जास्त आढळले.

राष्ट्रीय पक्षी मोराच्या संख्येत ३३ ने वाढ झाली. यंदा ८८ मोर आढळले. जिल्ह्याचा मानाचा खंड्याची संख्या २६ ने वाढून ५५ आढळली. घार, घुबड, होला यांच्या संख्येत घट झाली. चिमणी, कावळा, कोकिळ, पोपट, तुतवार, साळुंकी, बुलबुल पक्षांच्या संख्येत वाढ झाली. प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात पक्षी गणना केली जाते. त्यासाठी १३ ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शालेय परिसर, धरमाडी टेकडी, शेडगे वस्ती, धन्वंतरी विभाग, सडे रस्ता, उद्यान विद्या विभाग, मुळा उजव्या कालव्याचा पूर्व व पश्चिम भाग, भिंगारदे वस्ती आदींचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महानंद माने यांच्या प्रेरणेतून विद्यालयात विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांना निसर्गाची आवड निर्माण व्हावी म्हणून कृषी विद्यापीठातील ६ चौरस किलोमीटर परिसरात ४२ विद्यार्थिनी, ४६ विद्यार्थी, ७ अध्यापक अशा ९५ पक्षीप्रेमींनी १३ गट करून पक्षी गणनेत भाग घेतला. (Latest Marathi News)

कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. महानंद माने, महेश घाडगे, देवेंद्र वंजारी, गोरक्षनाथ शेटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यांनी घेतला सहभाग

विद्यार्थी गायत्री कुसमुडे, ओम माळी, अमोदनी गायकवाड, श्रावणी पानसंबळ, भक्ती उंडे, सई शिंदे, श्रावणी शेटे, यश गाडे, युवराज मोरे, ओम जगदाळे, प्रथमेश ठाकूर, जय पवार, समर्थ मंचरे, पीयूष धसाळ, भक्ती ढोकणे, सई भोरे, शिवांजली ढोकणे, चित्रा क्षीरसागर, अंजली गु़ंड, अंकिता बेल्हेकर, अलिशा पठाण, गायत्री वाणी यांनी गटप्रमुख काम केले. मुख्याध्यापक अरुण तूपविहिरे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, प्राथमिकचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री, पर्यवेक्षक मनोज बावा, जितेंद्र मेटकर, शिक्षक संतोष जाधव, घनश्याम राजदेव, ऋषिकेश दातीर, गोरक्षनाथ उचाळे, तुकाराम जाधव यांनी सहाय्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात पुराचा कहर; एकाचा मृत्यू, २४ तासांनंतरही शोध निष्फळ

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

सोहम बांदेकर अडकणार लग्नबंधनात! 'ही' मराठी अभिनेत्री होणार आदेश अन् सुचित्रा बांदेकरांची सून?

SCROLL FOR NEXT