अहिल्यानगर

प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक बिनविरोध करा - टेमकर

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगले काम केलेले आहे. सध्या सगळीकडे बिनविरोध निवडणुकीचे वारे सुरू आहे. तेव्हा शिक्षक बॅंकेची निवडणूकसुद्धा बिनविरोध झाली तर शिक्षकांचे पगार लवकर करून सुट्ट्या जादा देण्यात येतील.

नियमित पगारासाठी प्रशासन सहकार्य करील. तेव्हा सर्व शिक्षक संघटनांनी याचा विचार करावा, असे मिश्‍किल आवाहन शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी केले. 

प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांची शिक्षण उपसंचालकपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा जिल्ह्यातील शिक्षक संघटनांतर्फे सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी टेमकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी प्रभारी शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे, उपशिक्षणाधिकारी रमजान पठाण, गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे, संजय कळमकर, राजू साळवे, सलीमखान पठाण, आबा लोंढे, राजू राहणे, संजय धामणे, राजू शिंदे, राजेंद्र निमसे आदी उपस्थित होते.

बाळासाहेब चाबुकस्वार यांच्या पुढाकाराने सर्व संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगेश खिलारी यांनी सूत्रसंचालन तर नितीन पंडित यांनी आभार मानले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ohh Shit... मुंबई इंडियन्सचा उद्या सामना अन् दोन स्टार खेळाडू खेळणार नसल्याची धडकली बातमी, दोघांनी गाजवलाय T20 WC 2026

Solapur : उजव्या ऐवजी डाव्या हाताचं बोट कापलं, चिमुकला सांगत होता तरी महिला डॉक्टरने ऑपरेशन केलं; कुटुंबियांचे आरोप

अखेर बी.एड सीईटी झालीच नाही; सीईटी सेलचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांचा गोंधळ, शेकडो विद्यार्थी मुकले परीक्षेला

दहावी बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Nanded News : चिखली पोलिसांची कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून खुनातील दोन आरोपींना बेड्या

SCROLL FOR NEXT