Make school late because of cold demand of Balasahebanchi Shiv Sena Department of Education esakal
अहिल्यानगर

Ahmednagar School News : थंडीमुळे शाळा उशिरा भरवा

बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागणी; शिक्षण विभागाला निवेदन

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्ह्यात वाढत्या कडाक्याच्या थंडीमुळे सकाळच्या सत्रात भरणार्‍या शाळांची वेळ उशिराने करण्याची मागणी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना मदत वैद्यकीय कक्षाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी शिवसेना (बाळासाहेबांची) जिल्हा संपर्कप्रमुख तथा मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे रणजित परदेशी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत शेळके, शहर प्रमुख अनिकेत कराळे, तारिक कुरेशी आदी उपस्थित होते.

सध्या राज्यासह शहरात थंडीची तीव्र लाट सुरू आहे. शासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत सकाळच्या सत्रात सकाळी लवकर उठून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. पारा गोठवणार्‍या थंडीत विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारे शारीरिक हानी होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

थंडीची तीव्रता लक्षात घेऊन शहरासह जिल्ह्यात सकाळच्या सत्रातील शाळा एक ते दीड तास उशिराने भरवण्याची मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे. याबाबत तातडीने निर्णय घेऊन सर्व शाळांना आदेशित करण्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Student Protest: राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Latest Marathi News Live Update : बीड, जळगाव जिल्ह्यातील भाजपसह शरद पवार गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

SCROLL FOR NEXT