murder Sakal
अहिल्यानगर

जन्मदात्यानेच घेतला पोटच्या गोळ्याचा जीव, खुनाचा गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

नेवास (जि. अहमदनगर) : जन्मदात्यानेच स्वतःच्या नऊ वर्षांच्या मुलाला ठार केले. नेवासे तालुक्यातील प्रवरासंगम येथे ही घटना घडली. याप्रकरणी नेवासे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. त्यास नेवासे न्यायालयाने बुधवारपर्यंत (ता. २०) पोलिस कोठडी सुनावली आहे. शंकर रामनाथ पवार (वय ४७, रा. प्रवरासंगम, ता. नेवासे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, हा प्रकार बुधवारी (ता. १३) घडला होता. शनिवारी (ता. १६) याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी

नेवासे तालुक्यातील प्रवरासंगमजवळ गोदावरी नदी परिसरात राहणाऱ्या शंकर रामनाथ पवार याने अज्ञात कारणावरून नऊ वर्षांचा मुलगा सागरला बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हाता-पायाला दोरीने बांधून काठीने बेदम मारहाण केली. त्यात सागर बेशुद्ध होऊन मरण पावला.

झाडावरून पडल्याने मुलगा बेशुद्ध झाल्याची बतावणी करून नेवासे फाट्यावरील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलास मृत घोषित केले. या घटनेविषयी त्या नराधमाने कोणालाही काही न सांगता परस्पर गोदावरी नदी परिसरातील जुन्या डाक बंगल्याजवळ खड्डा खणून दफन केले. दरम्यान, नेवासे पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: लाडक्या बहिणींचा आत्मनिर्भरतेचा ‘फराळ’; योजनेच्या पैशातून महिलांचे उद्योग क्षेत्रात पाऊल

अनेकदा सांगूनही इथं का राहता? मध्यरात्री खोक्या भोसलेच्या कुटुंबावर हल्ला; कोयता, कुऱ्हाडीने मारहाण, ४ महिला जखमी

Latest Marathi News Live Update: शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची महत्वाची बैठक

Balasaheb Solaskar: झेडपीत राष्ट्रवादीला २५ जागा मिळतील: सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर; आगामी निवडणुकांसाठी पक्षीय पातळीवर तयारी सुरू

Bhau-Beej Recipes: भाऊबीजेचा आनंद करा डबल; तुमच्या भावंडांसाठी बनवा गाजर-अंजीर हलवा आणि पीज-टोमॅटो पुलाव, लगेच नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT