life imprisonment esakal Sakal
अहिल्यानगर

गुन्हा मागे घेण्यास नकार देणाराचा खून; एकास जन्मठेप

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : पोलिस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यास नकार देणाऱ्या फिर्यादीच्या नातेवाईकाचा खून करण्याची घटना सोनविहिर (ता. शेवगाव) येथे घडली होती. या गुन्ह्यात आरोपी विकास फुलसिंग भोसले (रा. मोरे चिंचोरा, ता. नेवासे) यास जन्मठेपेची व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी ठोठावली.

पोलिस ठाण्यात दाखल केलेला एक गुन्हा मागे घ्यावा, असे या गुन्ह्यातील आरोपी विकास फुलसिंग भोसले आणि रवी फुलसिंग भोसले (दोघे रा. मोरे चिंचोरा, ता. नेवासे) हे फिर्यादीचे नातेवाईक वृद्धेश्‍वर पुंजाराम काळे (रा. सोनविहिर, ता. शेवगाव) यांच्याकडे नेहमी मागणी करत होते. वृद्धेश्‍वर हे गुन्हा मागे घेण्यास तयार नव्हते. विकास भोसले, रवी भोसले आणि वृद्धेश्‍वरचा भाऊ सुरेश पुंजाराम काळे आणि मनिषा सुरेश काळे हे ता. 7 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी सात वाजता वृद्धेश्‍वरच्या घरी गेले. पोलिस ठाण्यातील गुन्हा मागे घेण्याच्या विषयावरून चर्चेला सुरूवात झाली. वृद्धेश्‍वर यांनी गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याचा राग आल्याने रवी भोसले याने वृद्धेश्‍वर यांच्या छातीमध्ये चाकू खुपसला. या हल्ल्यामुळे ते जीव वाचविण्यासाठी घराबाहेर पळाले. त्यावेळेस रवी आणि विकास भोसले यांनी पाठलाग करून पायावर दगड टाकून काठीने मारहाण केली.

वृद्धेश्‍वर यांना उपचारासाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्‍टरांनी त्यांना मयत घोषित केले. मयत वृद्धेश्‍वरची पत्नी सुनिता यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात आरोपी विकास, रवी भोसले आणि सुरेश काळे आणि मनिषा काळे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्‍वास पावरा यांनी या गुन्ह्याचा तपास केला. आरोपी विकास आणि मनिषा काळे यांना अटक करण्यात आली. उर्वरित दोन आरोपी करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले. या खटल्यात सरकारतर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. मनिषा काळे हिच्याविरुद्ध सबळ पुरावा आढळून न आल्याने तिला मुक्‍त करण्यात आले. विकास भोसले याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास खुनाबद्दल जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंड, बेकायदेशीर घरात घुसल्याबद्दल तीन वर्ष सक्‍तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ऍड. विष्णूदास भोर्डे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT