

Kurla Momos Food Poisoning
ESakal
मुंबई : कुर्ला पश्चिमेतील सुंदरबाग परिसरात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना अन्नविषबाधा झाली. उलट्या, जुलाब, ताप, पोटदुखी आणि चक्कर येण्याची लक्षणे जाणवू लागल्यानंतर या सर्वांना भाभा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. त्यापैकी १४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांवर बाह्यरुग्ण विभागाच्या (ओपीडी) माध्यमातून उपचार करण्यात आले.