The management of Panodi Gram Panchayat is in the hands of the teacher 
अहिल्यानगर

पानोडी ग्रामपंचायतीचा कारभार शिक्षकाच्या हाती

आनंद गायकवाड

संगमनेर ः शिर्डी विधानसभा मतदार संघातील राजकीयदृष्टया प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पानोडी ग्रामपंचायत सरपंचपदाच्या आरक्षणात एकमात्र उमेदवार असल्याने, महसूलमंत्री थोरात गटाचे गणपत येसू हजारे या शिक्षकांची वर्णी लागली आहे.

त्यांच्या रुपाने स्थापनेपासून पानोडी ग्रामपंचायतीत प्रथमच धनगर समाजाला संधी मिळाली आहे. नुकत्याच संगमनेर तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या असून, सरपंचपदासाठी 27 जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली.

पानोडी गावासाठी नागरिकाचा मागास प्रवर्ग पुरूषासाठी आरक्षण निघाले. या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत या प्रवर्गातून विजयी झालेले गणपत हजारे हे एकमेव विजयी उमेदवार असल्याने, त्यांची सरपंचपदी वर्णी लागली आहे.

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या साकुर येथील विरभद्र विद्यालयात शिक्षक असलेले हजारे शिस्त, प्रामाणिकपणा, पारदर्शक कारभार व विश्वासू या गुणांमुळे 12 वर्षांपूर्वी शेतकी संघाचे चेअरमन शिवाजीराव थोरात व माजी संरपच दिवंगत पाराजी सानप यांच्या आग्रहामुळे गावपातळीवरील राजकारणात सक्रीय झाले.

शेतकरी कुटूंबातील चांगले संस्कार व चुलते दादासाहेब हजारे यांचे राजकिय बाळकडू त्यांना मिळाले आहे. अटीतटीच्या राजकारणात वादविवाद टाळून संयमाने प्रश्न सोडवण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे त्यांचे सर्वांशी मैत्रिपूर्ण संबंध आहेत.

नुकत्याच झालेल्या निवडणूकीत 11 पैकी 7 जागांवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात पुरस्कृत शेतकरी विकास मंडळाने विजय मिळवून सत्ता काबीज केली आहे. 

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिवाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासाचे हे फळ आहे. सरपंचपदाचा आनंद तसेच जबाबदारी वाढल्याचे भानही आहे. माझ्या कार्यकाळात राज्य व केंद्र शासनाच्या ग्रामपंचायतीमार्फत येणाऱ्या योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा मानस आहे. तसेच गावातील पायाभूत सुविधांना महत्व देताना सर्वांना बरोबऱ घेवून समन्वयातून काम करणार आहे.

-गणपत हजारे, सरपंचपदाचे उमेदवार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT