As many as one thousand people were fined in Ahmednagar 
अहिल्यानगर

नगरमध्ये तब्बल एक हजारजण मोक्कार, सिगारेट पडली हजार रूपयाला

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. तोफखाना पोलिसांनी मार्च महिन्यात 983 व्यक्‍तींवर कारवाई करून तीन लाख सहा हजार 300 रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली. 

सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळून आल्यास पूर्वी दोनशे रुपये दंड होता. जिल्हाधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात दंडाची रक्कम पाचशे रुपये केली आहे. विनामास्क आणि मोटारवाहन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल 975 व्यक्‍तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

राजकीय नेते, डॉक्‍टर, व्यावसायिक, अशा समाजातील "मोठ्या' व्यक्‍तींवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मास्क नसणाऱ्यांकडून दोन लाख 26 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

लग्नसमारंभात 50पेक्षा जास्त व्यक्‍ती उपस्थित राहणे व सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याबद्दल आठ मंगल कार्यालय चालकांकडून प्रत्येकी 10 हजारांप्रमाणे 80 हजार रुपये दंड वसूल केला आहे. सावेडीतील चैतन्य हॉटेल रात्री आठनंतरही सुरू असल्याने चालक प्रमोद लगड यांना दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला. 

नगर-औरंगाबाद महामार्गावरील "काका का ढाबा'चे चालक मनमोहनसिंग यांनाही दहा हजारांचा दंड ठोठावला आहे. मुकेश कुकरेजा, रोहित कोडम, सागर हरबा यांना प्रत्येकी पाचशे, तर सिद्धार्थ बोरुडे यांना एक हजाराचा दंड ठोठावला आहे. 
पोलिसांचे वाहन पाहताच हॉटेलचालक दिवे बंद करून मागील दरवाजाने ग्राहकांना बाहेर काढत दंडाच्या कारवाईपासून बचाव करतात. त्यामुळे पोलिस वाहनांवरील दिवे बंद ठेवून, सायरन न वाजविता हॉटेलची झाडाझडती घेत कारवाई करीत आहेत. 

सिगारेट पडली एक हजाराला 
सावेडीतील डॉ. ना. ज. पाऊलबुद्धे विद्यालयाजवळील मोकळ्या मैदानात सिगारेट पीत असताना डॉ. राहुल अंबादास राशीनकर आढळून आले. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याबद्दल त्यांना पाचशे, तसेच धूम्रपान केल्याबद्दल पाचशे रुपये, असा एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. 

चोरावर पोलिस बनले मोर 
पोलिसांचे वाहन पाहताच हॉटेलचालक दिवे बंद करून मागील दरवाजाने ग्राहकांना बाहेर काढून देत आपला दंडाच्या कारवाईपासून बचाव करतात. मात्र, या चोरांवर पोलिस मोर झाले आहेत. रात्रीच्या वेळी पोलिसांनी आता वाहनावरील दिवे बंद ठेवत, सायरन न वाजविता हॉटेलांची झाडाझडती सुरू केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT