Maratha Reservation sakal
अहिल्यानगर

Maratha Reservation : कुणबीच्या नोंदी, सरकारदरबारी अनागोंदी

मराठा आरक्षणाचे पुरावे असूनही प्रमाणपत्र मिळवताना नागरिकांची दमछाक

अशोक निंबाळकर

नगर - कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी आरक्षण मिळते. परंतु अनेकांच्या कुणबी नोंदी सापडूनही त्यांना पूरक पुरावे जोडता येत नाहीत. विशेषतः मराठवाड्यातील दफ्तर निजाम राजवटीत विखुरले आहे. त्यातील उर्दू, मोडीतील कागदपत्रे पडताळताना सरकारी अधिकारी कुणबी प्रकरणे प्रलंबित ठेवतात. परिणामी, बहुतांश नागरिक प्रमाणपत्र मिळविण्याच्या वाटेला जात नाहीत.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जालना जिल्ह्यात मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू आहे. सरकारने मराठवाड्यातील सर्व मराठा नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. निजाम राजवटीत मराठ्यांना आरक्षण होते. तशी नोंद असल्याचे त्यांचे म्हटले आहे. मात्र, कुणबी नोंदीचे पुरावे शोधताना संबंधितांची दमछाक होते. निजामाची बहुतांशी कागदपत्रे ही हैदराबादच्या संग्रहालयात आहेत.

गावचे दफ्तर हे तहसील कार्यालयात आहे. त्या कागदपत्रांची उकल करणारी यंत्रणा नाही. वंशावळ जुळल्याशिवाय अधिकारी प्रकरणे निकाली काढीत नाहीत. सामान्य माणूस कोणत्या तरी एजंटाच्या कच्छपी लागून लाखो रुपये गमावून बसतो. त्यामुळे एकच नोंद ग्राह्य धरण्याबाबत अध्यादेश निघाल्याशिवाय कोंडी फुटणार नाही.

रेकॉर्ड तिथेच, गावांची अदलाबदल

निजाम राजवटीत महसूल पुराव्यांवर बहुतांशी कुणबी, मराठा नागरिकांच्या रेकॉर्डवर कास्तकर ही नोंद आहे. ही नोंद कुणबी नागरिकांना अडचणीची ठरते. त्या राजवटीत न्याय-निवाड्यावेळी जातीचे उल्लेख करण्याची प्रथा नव्हती. मराठवाड्यातील काही तालुके पश्चिम महाराष्ट्रात आले. नगरचे काही तालुके, गावे मराठवाड्यात समाविष्ट करण्यात आली. त्या रेकॉर्डचीही अदलाबदल झाली नाही. ती कुणबी दाखल्याची प्रकरणे नेमकी कोठे दाखल करायची याबाबतही संदिग्धता आहे. यातून प्रकरणे प्रलंबित राहतात.

कुणबी प्रमाणपत्रासाठी दोन पुरावे महत्त्वाचे असतात. शाळेच्या दाखल्यात कुणबी उल्लेख आढळला तरी त्याची महसुली पुराव्याशी तसेच वंशावळीशी पडताळणी करावी लागते. ती सापडली नाही तर प्रमाणपत्र मिळत नाही. काहींना तर नेमकी कागदपत्रे कोठे शोधायची हेही माहिती नसते. त्यामुळे त्यांची फसवणूक होऊ शकते.

- डॉ. संतोष यादव, मोडी अभ्यासक, नगर

नेमकी गोची काय

कुणबी दाखल्यासाठी शाळेचे रेकॉर्ड, महसूल पुरावे, न्यायालयाचे निकाल, शासननिर्णय ग्राह्य धरले जातात. मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रात ब्रिटिश राजवट होती. तिथे न्यायालयाचे निकाल, महसूल नोंदी, जन्म-मृत्यूच्या नोंदी करताना जातीचा उल्लेख केला जायचा.

मराठवाड्यात मात्र जन्म-मृत्यूच्या नोंदीवेळी जातीचा उल्लेख आढळत नाही. केवळ घरांच्या नोंदीत जातीचा उल्लेख आहे. ही कागदपत्रे उर्दू आणि मोडीतील आहेत. निजाम संस्थान बरखास्त झाल्यानंतर दफ्तराची फारशी दखल घेतली नाही. ते अद्ययावत करण्यात आलेले नाही. त्यामुळेही पुरावे शोधताना अडचणी येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT