ahmednagar sakal
अहिल्यानगर

Maratha Reservation : शेवगाव तालुक्यात पुढाऱ्यांना ‘नो एन्ट्री’; वेशीवर फलक, आरक्षण मिळेपर्यंत गावबंदी

प्रस्थापित राज्यकर्ते हे मराठ्यांची उधड बाजू कधीच घेताना दिसले नाही आणि अजूनही दिसत नाहीत.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

शहरटाकळी - शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव, मठाचीवाडी, मजले शहर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने गावाच्या चौकात सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली. याचा फलक गावाच्या वेशीवर लावण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षाच्या नेत्यांना गावात येऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. ‘चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष; मराठा आरक्षण हेच आमच लक्ष्य’असा मजकूर फलकावर आहे.

प्रस्थापित राज्यकर्ते हे मराठ्यांची उधड बाजू कधीच घेताना दिसले नाही आणि अजूनही दिसत नाहीत. त्यांना मताची भीती वाटते म्हणून ते आपल्या बाजूने येत नाहीत. राजकीयदृष्ट्या मराठे जागे असतात. पण, त्यांना मतदार म्हणून देखील जागे होणे गरजेचे आहे. नवा राजकीय पर्याय देखील आपण उभा केला पाहिजे,

तरच हे सर्व प्रस्थापित पक्ष वठणीवर येथील, हे कळल्याने आणि मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रेरणेने प्रेरित व हक्काच्या आरक्षणासाठी ते देत असलेल्या लढाईस पाठिंबा म्हणून भावीनिमगाव, मठाचीवाडी, मजले शहर येथील सकल मराठा समाजाने सर्व आजी-माजी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करून जिल्ह्यात सर्व प्रथम पुढाकार घेतला असल्याचे नंदकुमार शेळके यांनी सांगितले. गुरुवारपासून (ता.१९) भावीनिमगाव येथील गावबंदीचा बोर्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

भावीनिमगाव परिसरातील गावांमध्ये सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी करा. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही.

- प्रा. नंदकुमार शेळके, भावीनिमगाव

आम्हाला देशाची घटना समजते. आता समाज जागा झाला आहे. आरक्षण मिळाले पाहिजे.

- रामजी शिदोरे, मठाचीवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT