अहिल्यानगर

हृदय पिळवटून टाकणारी घटना! लेकीवर काळाची झडप अन्‌ बापानेही घेतला जगाचा निरोप

सकाळ डिजिटल टीम

राशीन : एकुलत्या एक विवाहित लाडक्या लेकीच्या मृत्यूची खबर ऐकताक्षणीच बापानेही इहलोकीचा निरोप घेतला. बाप आणि लेकीवर काळाने अवेळी घातलेली ही झडप राशीनसह परिसरातील लोकांच्या जिवाला चटका लावून गेली. बाप आणि लेकीच्या जाण्याने नातेवाइकांनी फोडलेला टाहो आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या आक्रंदनात अवघी देशमुखवाडी शोकसागरात बुडाली. ही घटना शुक्रवारी घडली.

अंगणवाडी सेविका असलेल्या मीनाक्षी सोमनाथ पवार (वय ३४, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले. याची खबर त्यांचे वडील भागवत विष्णू दंडे (वय ६५, रा. देशमुखवाडी, ता. कर्जत) यांना समजता क्षणी त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि त्यातच त्यांचाही मृत्यू झाला.

बाप-लेकीचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने राशीनसह परिसरात हळहळ करीत चर्चा सुरू होती. मीनाक्षीच्या मागे पती, दोन मुले आणि सासू-सासरे, तर दंडे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून आणि नातवंडे, असा परिवार आहे. दंडे हे पैलवान असल्याने राशीनमध्ये वस्ताद नावाने सुपरिचित होते. मीनाक्षीवर डोर्लेवाडी येथे, तर दंडे यांच्यावर देशमुखवाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT