woman suicide in Well Sakal
अहिल्यानगर

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. विवाहितेने या छळाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. विवाहितेने या छळाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

अहमदनगर - माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा (Married Women) छळ करण्यात आला. विवाहितेने या छळाला कंटाळून विहिरीत (Well) उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली. रेखा अनिल गुंजाळ (वय 24, रा. सोनेवाडी, ता. नगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. सोनेवाडी शिवार, मेहेकरी फाट्याजवळ ही घटना घडली. या प्रकरणी पती, सासू, दीर यांच्यासह चौघांविरूध्द नगर तालुका पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

मयत रेखाचा भाऊ मोहन अण्णा वेठेकर (वय 30, रा. पांढरेवाडी, कोळगाव ता. श्रीगोंदे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी अनिल रामकिसन गुंजाळ, अमोल रामकिसन गुंजाळ, मंगल रामकिसन गुंजाळ व दीपक गोरख गुंजाळ (सर्व रा. सोनेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखाचा विवाह अनिल सोबत झाला होता. ती सासरी नांदत असताना आरोपींनी तिचा घरगुती खर्चासह, शेती खर्चासाठी माहेरून पैसे आणावे यासाठी छळ केला. तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक चव्हाण या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israeli Woman Assault : पर्यटनासाठी आलेल्या इस्रायली महिलेसह दोघींवर सामूहिक अत्याचार; दोषी ठरलेल्या तिघांना फाशी, काय आहे प्रकरण?

Fergusson College Road Clash: क्षणात पेटला वाद, पुढच्याच मिनिटाला दोन गटात मारामारी! एफसी रोडवरील थरार CCTV मध्ये कैद!

महादेव मुंडे हत्या प्रकरणात आज दोघांची नार्को टेस्ट, वाल्मिक कराडच्या घरी होते कामाला; गूढ उलगडणार?

Valentine's Day 2026: व्हॅलेंटाईनला फुलांपेक्षा कंडोमची विक्री जास्त! 'हे' शहर आघाडीवर, भारतात नवा ट्रेंड

Ahilyanagar leopard: घरात घुसला अन् बाथरूममध्ये फसला; भिंगारमधील सौरभनगर परिसरात बिबट्या अखेर जेरबंद, बिबट्या आल्याने पळापळी!

SCROLL FOR NEXT