The mayor explained the reasons for the water shortage in Kopargaon 
अहिल्यानगर

कोपरगावातील पाणीटंचाईची नगराध्यक्षांनी सांगितली कारणे

मनोज जोशी

कोपरगाव : पालिकेतील सत्तेचा वर्षांनुवर्षे गैरवापर करून मुख्य जलवाहिनीवर जोड घेत प्रचंड पाणीवापर करणाऱ्यांमुळे शहरवासीयांना टंचाईला सामोरे जावे लागते. नैतिकता असेल, तर बेसुमार पाणीवापर करणाऱ्यांनी किमान दहापट पाणीपट्टी भरली पाहिजे, असे खडेबोल सुनावताना नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सर्वाधिक पाणीवापर करणाऱ्यांची नावेच जाहीर केली. 

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की दुसऱ्यांच्या नावावर पालिकेचे गाळे घेऊन, कर्मचाऱ्यांवर दबाव आणून, फुकट गाळा वापरण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न बुडून शहरविकासाला पैसा कमी पडतो. जास्त पाणी वापरणाऱ्यांचा पाणीपुरवठा एक ते दीड तासांवर आणण्याचे काम सुरू आहे. कर्मचाऱ्यांना हाताशी धरून,

अधिकाऱ्यांवर दबाव आणून वर्षांनुवर्षे मनमानी करणाऱ्यांना भानावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काळे शॉपिंग कॉम्प्लेक्‍सच्या वाहनतळावर व्यावसायिक गाळे बांधून त्याच्या विक्रीतून प्रचंड पैसा कमावला गेला. आता हे गाळे काढण्याबाबत नोटिस दिली आहे. शहरातील हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्यांकडून हप्ते उकळणाऱ्यांची नावेही लवकरच जाहीर करणार असल्याचे वहाडणे यांनी सांगितले. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT