meeting in rahuri complaints prajakt tanpure and lahu kande ahmednagar Sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : राहुरीत आमसभेत तक्रारींचा पाऊस; आमदार प्राजक्त तनपुरे व लहू कानडे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

राहुरी येथे आज (मंगळवारी) आमदार तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा झाली.

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : तालुक्यातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी बोलविलेल्या आमसभेत तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला. त्यामुळे आमदार प्राजक्त तनपुरे व आमदार लहू कानडे यांच्या संतापाचा पारा चढला. त्यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

राहुरी येथे आज (मंगळवारी) आमदार तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा झाली. आमदार कानडे, तहसीलदार चंद्रजीत राजपूत, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, प्रभारी गटविकास अधिकारी सिनारे, जलजीवन मिशन, पंचायत समिती, महसूल, वन, जलसंपदा, महावितरण विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.

जलजीवन मिशनच्या ‘हर घर जल’ अंतर्गत पाणी योजनांच्या कामासंदर्भात सर्वाधिक तक्रारी आल्या. कार्यारंभ आदेशाला एक वर्ष होऊनही योजनांची कामे सुरू झाली नाहीत. ठेकेदाराने कामे अपुरी ठेवली. मुदत संपली, तरी कामे सुरू केली नाहीत. अशा तक्रारी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मांडल्या.

त्यावर आमदार तनपुरे यांनी जलजीवनचे अभियंता व गटविकास अधिकारी यांना धारेवर धरले. त्यांनी वरशिंदे येथील जलजीवनचे काम आठ दिवसांत सुरू करण्याचे आदेश दिले. निधी मंजूर असलेल्या तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना आमदार कानडे यांनी तहसीलदारांना केली.

खुडसरगाव येथील लोकनियुक्त आदिवासी महिला सरपंच बेबीताई माळी यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या तीन महिन्यांत संपणार आहे. परंतु, त्यांना आजपर्यंत सरपंच पदाचे मानधन मिळाले नाही. या तक्रारीमुळे आमदार तनपुरे यांनी लालफितीच्या कारभारावर संताप व्यक्त केला.

ग्रामपंचायत पदाधिकारी नितीन कल्हापुरे (देसवंडी), अर्जुन म्हसे (कोंढवड), वैभव जरे (पिंप्री वळण), सुरेश शिरसाठ (कोल्हार खुर्द), प्रमोद तारडे (केंदळ बुद्रुक), अय्युब पठाण (राहुरी खुर्द), निसार सय्यद (वाघाचा आखाडा), संजय खरात (चेडगाव), प्रकाश देठे (खुडसरगाव) आदींसह नागरिकांनी समस्या मांडल्या.

बाजार समितीचे उपसभापती गोरक्षनाथ पवार, संचालक बाळासाहेब खुळे, सुरेश निमसे, रवींद्र आढाव, भारत तारडे उपस्थित होते.

पोलिस भरती प्रक्रियेबाबत आवाज उठवा

पोलिस शिपाई भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवावा, अशा मागणीचे निवेदन पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांनी दिले. शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मानधन वाढीसह विविध मागण्यांचे निवेदन आमदार तनपुरे व आमदार कानडे यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT