supe midc 
अहिल्यानगर

ही एमआयडीसी सापडली समस्यांच्या विळख्यात 

मार्तंड बुचुडे

पारनेर : सुपे येथील जुन्या औद्योगिक वसाहतीतील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. तसेच येथे अनेक ठिकाणी अतिक्रमणेही झाली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेले विजेचे दिवे अनेकदा बंद असतात. येथे होणारा पाणीपुरवठाही कमी दाबाने होत असल्याने उद्योजकांसह अनेक व्यावसायिकांची तारांबळ होते. अशा प्रकारे जुनी औद्योगिक वसाहत विविध समस्यांच्या गर्तेत सापडली आहे. 

हेही वाचा या सालगड्याचा मुलगा असा झाला मंत्री... आता देह झाला चंदनाचा 

सुपे येथील जुनी औद्योगिक वसाहत 1998 मध्ये 329.84 हेक्‍टरवर जागेवर उभारण्यात आली. या ठिकाणी 535 भूखंड तयार करण्यात आले. त्यांपैकी 517 भूखंडांचे वाटपही झाले. मात्र, अनेकांनी भूखंड फक्त ताब्यात घेऊन, कोणतेही उद्योग तेथे सुरू केले नाहीत. त्या भूखंडांवर केवळ पत्र्याच्या शेड उभ्या केल्या आहेत. जास्त पैसे घेऊन भूखंडाची विक्रीही सुरू आहे. पैसे मिळविण्यासाठी भांडवलदारांनी केलेला हा उद्योग एमआयडीसीच्या मुळावर आला आहे. त्यामुळे अतिशय कमी प्रमाणात व तेही खूप छोटे व्यवसाय कार्यरत आहेत. अनेक व्यवसाय यापूर्वीच बंद झाले आहेत. त्यातही शुद्ध पाणी तयार करणे व दूधसंकलन केंद्रांची संख्या अधिक आहे. या वसाहतीत अनेक समस्या भेडसावत असल्याने येथे नव्याने उद्योजक येऊ इच्छित नाहीत. 

आवश्‍य वाचा बोगस बियाण्याबाबत खासदार लोखंडे म्हणतात... 

वसाहतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणेही झाली आहेत. याबाबत अनेकांनी वसाहतीच्या कार्यालयात तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. गतवर्षी नव्याने झालेले रस्तेही आता उखडले आहेत. विजेचाही अनेकदा लपंडाव सुरू असतो. तसेच, वसाहतीला होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने उद्योग- व्यावसायिकांची तारांबळ होते. अनेकांना टॅंकरने विकत पाणी आणावे लागते. उन्हाळ्यात तर येथे पाण्याची मोठी समस्या असते. विजेच्या लपंडावामुळे येथील व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 
...... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT