Minister Balasaheb Thorat removed his own flex 
अहिल्यानगर

मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतःचाच फ्लेक्स हटवला

आनंद गायकवाड

संगमनेर ः गेल्या काही वर्षात संगमनेर शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण करणाऱ्या फ्लेक्‍सची रेलचेल झाल्याने शहराची ओळख फ्लेक्‍सचे शहर अशी होऊ लागली.

शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या या फलकांबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कारवाई सुरू केली. आधी स्वतःचे छायाचित्र असलेला नववर्ष शुभेच्छेचा फलक काढून या उपक्रमास प्रारंभ केला. 

संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणातून जाणाऱ्या नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला राज्यातील हायटेक बसस्थानक उभारले आहे. सर्वार्थाने परिपूर्ण असलेल्या या बसस्थानकाच्या परिसरात लागलेल्या अनेक लहानमोठ्या फ्लेक्‍सच्या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याची बाब थोरात यांना जाणवली.

बसस्थानकावर थांबून त्यांनी स्वतःचे छायाचित्र असलेला फलक हटविला. संगमनेर बसस्थानकाचा मध्यवर्ती परिसर सर्व प्रकारच्या जाहिरातींचे केंद्र बनला आहे. आज या प्रकाराची महसुलमंत्र्यांनीच दखल घेतल्याने तातडीने सूत्रे हलली. बसस्थानक परिसरातील फलकापासून सुरवात झाली. 

गणेशनगर, सह्याद्री कॉलेज, नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग, नवीन नगर रोड, दिल्ली नाका या सर्व ठिकाणी लावलेले फलक आगामी दोन दिवसात काढून टाकण्यात येणार आहेत. तसेच नगरपरिषदेच्या सशुल्क परवानगी शिवाय फलक लावण्यास बंदी घालण्यात येणार आहे.

या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम आदींसह नगरपरिषदेचे बाळू कुळधरण, राजेंद्र सुरग, अखलाक शेख, कैलास अभंग आदी उपस्थित होते. या कारवाईचे पर्यावरणप्रेमी नागरिकांनी स्वागत केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT