Minister Gadakh's panel wins in Nevasa 
अहिल्यानगर

नेवाशात मंत्री गडाख, दुसरं कोण; सोनईत फडकला शिवसेनेचा भगवा

विनायक दरंदले

सोनई (जि.अहमदनगर ): जिल्ह्यात मोठी उत्सुकता लागलेल्या सोनई ग्रामपंचायत निवडणूकीत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाने सतरा पैकी सोळा जागा जिंकत भगवा फडकला आहे. माजी खासदार तुकाराम गडाख गटाला अवघी एक जागा मिळाली आहे. 

दोन गडाखांतील ही लढत मोठी अटीतटीची होईल, असा अंदाज सुरवातीला व्यक्त होत होता. मात्र, प्रत्यक्ष निकालानंतर मंत्री गडाख गटाने सरशी केली आहे.

माजी खासदार गडाख दहा वर्षानंतर राजकीय मैदानात उतरले होते. त्यांनी सर्व प्रभागांत मतदारांची गळाभेट घेत सभा घेतली होती. सभेत आश्वासनांचा पाऊस पाडूनही त्यांच्या प्रकाश शेटे गटाला अवघी एक जागा जिंकता आली आहे.

मंत्री गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख व युवानेते उदयन गडाख यांनी किल्ला लढवत सतरा पैकी सोळा जागा जिंकून आणल्याने कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे.

विजयी उमेदवार असे  ः नवनाथ दरंदले, श्वेताली दरंदले, सवित्रा ओहळ, धनंजय वाघ, सुरेखा पवार, जयश्री तागड, सविता राऊत, किशोर वैरागर, प्रसाद हारकाळे, इम्तेसाम सय्यद, भानुदास कुसळकर, मच्छिंद्र कुसळकर, विद्या दरंदले, राजेंद्र बोरुडे, प्रभाकर गडाख, अलका राशिनकर (सर्व जगदंब मंडळ). शोभा शेटे (ग्रामविकास मंडळ)

संपादन - अशोक निंबाळकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT