Former MLA Dr. Narendra Ghule Patil  esakal
अहिल्यानगर

मुळा उजवा कालवा दुरुस्तीसाठी 10 कोटींचा निधी द्या - घुले पाटील

सुनिल गर्जे

नेवासे (जि. अहमदनगर) : शेवगाव, पाथर्डी व नेवासे तालुक्यातील लाभक्षेत्रात टेलच्या भागापर्यंत पूर्ण दाबाने पाणी मिळावे यासाठी मुळा उजवा कालव्यावरील ब्रँच-२ , टेल डीवाय व पाथर्डी ब्रँच नूतनीकरणासाठी दहा कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करावा अशी मागणी माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील यांनी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे केली आहे.

घुले पाटील म्हणाले,

जायकवाडी धरण होतांना धरणासाठी जमिनी गेल्या त्या धरणग्रस्त शेतकऱ्यांना आणि पूनर्वसन करण्यासाठी ज्यांच्या जमिनी घेतल्या त्या शेतकऱ्यांना मुळा धरणाचे बारामाही पाणी देण्याचे सरकारने आश्वासित केले होते. मात्र प्रत्यक्षात कोणालाच पाणी मिळत नाही. मागील वर्षी मुळा धरण शंभर टक्के भरून सुद्धा टेलच्या भागात पाणी पोहचले नाही. त्यामुळे शेवगाव, पाथर्डी व नेवासे तालुक्यातील लाभक्षेत्रात टेलच्या भागापर्यंत पूर्ण दाबाने पाणी मिळावे. यासाठी मुळा उजवा कालव्यावरील तीस गावांना लाभ मिळणारी ब्रँच-२ चे नूतनीकरणासाठी चार कोटी ८९ लाख, २५ गावांना लाभ मिळणारी टेल डीवायच्या नूतनीकरणासाठी १ कोटी ६० लाख रुपये व ३६ गावांना लाभ मिळणारी पाथर्डी ब्रँचच्या नुतनीकरणासाठी ३ कोटी ३६ लाख असा ९ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करावा अशी मागणी केली.

आमदार घुलेंच्या 'या' प्रश्नाने वेधले सर्वांचे लक्ष

नेवासे तालुक्यात असणाऱ्या कौठा या गावात मुळा मुख्य कालवा नेहमीच फुटत असतो त्यामुळे कालव्याची वहन क्षमता कमी होते याबाबत तोडगा काढण्यासाठी सद्यप्रश्नांकडे माजी आमदार घुले यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार (ता. २९) रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव, पाथर्डी व नेवासे तालुक्यातील शेतककऱ्यांचे शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांची भेट घेऊन मुळा उजवा कालवा वितरका नूतनीकरण करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली.

मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी माजी नरेंद्र घुले पाटील यांचे मुद्दे गांभीर्याने घेत या प्रश्नांवर तात्काळ मार्ग काढण्याच्या संबंधितांना सुचना देत, या कामासाठी तातडीने निधी देण्याचे ही आश्वासन दिले.

यावेळी यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग, शेवगावचे सभापती डॉ. क्षितिज घुले, काकासाहेब नरवडे, जलसंपदाचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे मुख्य अभियंता डॉ.संजय बेलसरे, विशेष प्रकल्प पुण्याचे मुख्य अभियंता एस.टी.धुमाळ, अहमदनगरचे अधिक्षक अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक अ. रा. नाईक, नाशिकच्या अधिक्षक अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या प्रशासक श्रीमती अ. ह. अहिरराव, अहमदनगर मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता का. ल. मासाळ, अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नेार, मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, कुकडी कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील शिंदे, लघु पाटबंधारे क्रमांक दोन विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती संगिता जगताप उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Pasand: दोघात तिसरी..! 'कमला पसंद' कंपनीच्या मालकाच्या सुनेने दिला जीव; चिठ्ठीमध्ये नेमकं काय?

T20 world Cup Final नंतर आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद अहमदाबादला! आज झाला मोठा निर्णय

India's Test Downfall: तुला हवं ते सर्व दिलं अन् तू टीम इंडियाचं वाटोळं केलंस! गौतम गंभीरच्या हट्टापाई कसोटीत आपली पिछेहाट...

SMAT 2025: ऋतुराज गायकवाडने मोडले विराट-गिलचे विक्रम, पण महाराष्ट्राचा पहिल्याच सामन्यात पराभव; पृथ्वी शॉही अपयशी

Latest Marathi News Live Update: करवाढीवर सर्वोच्च न्यायालयात पार पडली सुनावणी

SCROLL FOR NEXT