Minister Prajakt Tanpure says 50 percent electricity will be provided 
अहिल्यानगर

पाच वर्षांतील दंड, व्याज वगळता उर्वरित रकमेच्या 50 टक्के विज बिल भरण्याची सुविधा देणार

गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : "राज्यातील धरणे, बंधारे दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री जलसंधारण योजनेतून निधीची तरतूद झाली आहे. सर्व जुनी धरणे आणि बंधाऱ्यांचे नूतनीकरण केले जाणार आहे. केंद्राचे साखर आयात- निर्यातीचे धोरण निश्‍चित नसल्याने, कारखानदारी डबघाईस येण्याच्या अवस्थेत आहे.

अशोक कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीत दूरदृष्टीने कारखान्याचे आधुनिकीकरण केले. इथेनॉल, वीज प्रकल्प, डिस्टिलरी उभारून विकासाचा मार्ग शोधला,'' असे प्रतिपादन जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

अशोक कारखान्याच्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन मंत्री गडाख, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार भानुदास मुरकुटे होते. मंत्री गडाख म्हणाले, ""सरकारी धोरणाच्या केंद्रस्थानी शेतकरी, ऊसउत्पादक आणि साखर कारखानदारी आहे. त्यादृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. राज्यातील धरणे, बंधाऱ्यांची अनेक वर्षांपासून दुरुस्ती झालेली नाही. दुरुस्ती करून त्यांच्या क्षमतावाढीचे धोरण सरकारने ठरविले आहे. त्यासाठी 1600 कोटींची तरतूद केली आहे.''

राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, ""मागणीत वाढ झाल्याने वीजपुरवठा करणे अवघड झाले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेतून सौरऊर्जा केंद्र उभारून वीज देण्याचे धोरण आहे. त्यानुसार सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. वीजबिलांच्या थकबाकीची समस्या गंभीर आहे. कृषीसह अन्य क्षेत्राची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या पाच वर्षांतील दंड, व्याज वगळता, उर्वरित रकमेच्या 50 टक्के बिल भरण्याची सुविधा देणार आहोत. तसेच, दोन वर्षांपूर्वीपासून बंद असलेले वीजजोडणी देण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.''

कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ यांनी आभार मानले.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan-Pandharpur Railway Project : ब्रिटिशकालीन फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पाला वेग! जमीन मोजणी पूर्ण, रेल्वेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू

Marathi News Live Updates : राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Daily Horoscope: आजचे राशी भविष्य २१ सप्टेंबर २०२६

टिटवाळ्यात गणपती विसर्जनावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी; भाजप-ठाकरे सेनेचे नेते, नगरसेवक भिडले, तणावाचं वातावरण

Shardul Thakur : चूक सांगण्यासाठी धावत आलेल्या शार्दूलचं रोहित शर्माने ऐकूनच घेतले नाही अन् मग...; Video

SCROLL FOR NEXT