Minister Tanpur built the Rahuri-Deswandi road at his own expense 
अहिल्यानगर

मंत्री तनपुरेंनी स्वखर्चाने तयार केला राहुरी-देसवंडी रस्ता

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : राहुरी ते देसवंडी दरम्यान मुळा नदीपात्रातील रस्ता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्वखर्चातून तयार करून दिला. आज (सोमवारी) देसवंडी व तमनर आखाडाच्या ग्रामस्थांना रस्ता सुरू झाल्याने, गैरसोय दूर झाली. 

वाळूतस्करांनी मुळा नदी पात्रातील शासकीय मालकीची वाळू चोरून, मोठे खड्डे तयार केले होते. त्यामुळे, नदीपात्रातील रस्ता बंद झाला होता. देसवंडी व तमनर आखाडा येथील ग्रामस्थांना राहुरीला येण्यासाठी राहुरी खुर्द वरून जावे लागत होते. त्यामुळे, तीन किलोमीटर अंतर वाढले होते. शालेय विद्यार्थी यांची मोठी गैरसोय झाली होती. 

मागील आठवड्यात देसवंडीचे सरपंच दीपक खेवरे, अरुण कल्हापुरे, प्रवीण शिरसाठ व इतर ग्रामस्थांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन, नदीपात्रातील रस्ता तयार करून देण्याची मागणी केली होती.

राज्यमंत्री तनपुरे यांनी नदीपात्रात प्रत्यक्ष पाहणी करून, रस्त्याच्या कामासाठी पोकलेन मशीन व सिमेंटच्या नळ्या उपलब्ध करून दिल्या. आज रस्त्याचे काम पूर्ण झाले. ग्रामस्थांना जवळचा मार्ग खुला झाला. त्यामुळे, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: पुणे जिल्ह्यात दाेन दिवसांपासून अवकाळीने शेतीचे नुकसान: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अँक्शन मोडवर, तातडीने पंचनाम्याचे निर्देश!

Dhurandhar 2 ने पहिल्याच दिवशी कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला, बॉलिवूडच्या ओपनर सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडले

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

SCROLL FOR NEXT