Minister Thorat said the corona infection is in its third phase 
अहिल्यानगर

मंत्री थोरात म्हणाले, कोरोना संसर्ग तिसऱ्या टप्प्यात, आता काळजी घ्या

आनंद गायकवाड

संगमनेर ः शहरासह तालुक्‍यात कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रशासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहे. त्यात नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक असून, घरगुती समारंभासाठी होणारी गर्दी टाळणे गरजेचे आहे.

भावनेपेक्षा वस्तूस्थितीला महत्व देत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनावर मात करण्यासाठीचे "माझे कुटुंब-माझी जबाबदारी' हे अभियान तालुक्‍यात प्रभावीपणे राबवण्याची सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. 

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

हेही वाचा - 

मंत्री थोरात म्हणाले, ""राज्यात कोरोना तिसऱ्या टप्प्यात आला असून, त्याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात "माझे कुटुंब-माझी जबाबदारी' हे अभियान राबविण्यात येत आहे. त्या माध्यमातून तालुका पातळी, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गट व गावनिहाय स्थापन केलेल्या आरोग्य समितीद्वारे जनजागृती करावी. ग्रामीण भागातील घरगुती समारंभ नागरिकांनी जाणीवपूर्वक टाळण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे. भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या. कोरोनाची साखळी तोडणे, हे आपले सर्वांचे अंतिम उद्दिष्ट आहे.'' 

थोरात यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही कोरोनाचे कमी झालेले गांभीर्य व वाढत्या गर्दीविषयी चिंता व्यक्त केली. नगराध्यक्ष दुर्गा तांबे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती मीरा शेटे, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ आरगडे, अजय फटांगरे डॉ. हर्षल तांबे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, विष्णुपंत रहाटळ, बी. आर. चकोर, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगळूरे, तहसीलदार अमोल निकम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. संदीप कचेरीया, पोलिस निरीक्षक अभय परमार, सुनील पाटील, कार्यकारी संचालक जग्गनाथ घुगरकर आदी उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मॉन्सूनची चाल मंदच, राज्यात 'या' तारखेपासून पावसाचा जोर वाढणार; कृषी विभागाचं शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन

Abhijit Dipke: आम्हाला फेक म्हणण्यापेक्षा म्हणणं समजून घ्या, देशात आंदोलनकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न : अभिजित दिपके

Petrol Excise Duty: पेट्रोल स्वस्त होणार? सरकारकडून उच्च इथेनॉल पेट्रोलवरील कर माफ; पण E30 मुळे वाहनधारकांची चिंता वाढणार?

Vaibhav Sooryavanshi: मुलासाठी विकली वडिलोपार्जित जमीन; आता वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी जे सांगितलं, ते ऐकून तुम्हीही भावुक व्हाल...

Smart Prepaid Meter : लाईटबिल भरण्याची कटकट संपवा! ५०० रुपयांच्या रिचार्जवर किती दिवस चालतो स्मार्ट प्रीपेड मीटर? पैसे वाचवणार

SCROLL FOR NEXT