minor daughter sexually abused by father minor daughter sexually abused by father
अहिल्यानगर

संगमनेर : जन्मदात्या बापाकडून 11 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

आनंद गायकवाड

संगमनेर (जि. अहमदनगर) : राज्यात मुली आणि महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटना थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीयेत, राज्याला अशा घटनांनी हदरवून सोडलं असतानाच अहमदनगर जिल्ह्यातून आणखी एख धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पत्नी माहेरी गेल्याची संधी साधून जन्मदात्या बापानेच स्वत:च्या ११ वर्षाच्या चिमुरडीवर तीन वेळा अत्याचार केले.

ही घटना संगमनेरच्या उपनगरात घडली. याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसांनी बापाला अटक केली आहे. फिर्यादी महिला घरगुती वादातून माहेरी गेली असताना, मुलगी व तिचा बाप घरात होते. पोटच्या मुलीवरच नराधम बापाने ( ता. २२ व २८ जुलै २०२१) च्या रात्री तसेच दोन आठवड्यांनी पुन्हा एकदा असा तीन वेळा तिच्यावर अत्याचार केले. तिची आई घरी परतल्यानंतर हा प्रकार उघड झाला. यामुळे संतप्त झालेल्या आईने पोलिस ठाणे गाठून पतीच्या घृणास्पद कृत्याची माहिती देत फिर्याद दिली.

पोलिसांनी याप्रकरणी अत्याचारी बापाला अटक केली आहे. त्याला आज प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता चार ऑक्टोबर पर्यंत पाच दिवस पोलिस कोठडीत ठेण्याचा आदेश दिला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक निकीता महाले करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-India Trade Deal : व्यापार करार कसा असणार? फायदा कुणाला? शेतीसाठी काय? वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दिले स्पष्टीकरण

NIA Recruitment 2026: धुरंधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! NIA मध्ये मेगा भरती जाहीर, पाहा पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

ZP Elections 2026 Voting Live Update : भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

रणपति शिवराय - स्वारी आग्रा : धाडस आणि शौर्याची थरारक कथा

Red Waterfall Video : अंटार्क्टिकात 'लाल पाण्याचा झरा'; हे रक्त आहे का? व्हायरल व्हिडिओने जगभर खळबळ

SCROLL FOR NEXT