Government Officer Assets Worth ₹4.75 Crore Exposed
esakal
तेलंगणामध्ये भ्रष्टाचाराचं एक धक्कादायक प्रकरण समोर आला आहे. शहरातील गरीब कुटुंबांना मदत करण्याची जबाबदारी असलेल्या सरकारी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचा आरोप झाला आहे. सैयद यदागिरी राव नल्लागुंटा असं या अधिकाऱ्याचं नाव असून ते Mission for Elimination of Poverty in Municipal Areas (MEPMA) या विभागात अतिरिक्त संचालक आहेत.
तेलंगणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांशी संबंधित १० ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत सुरुवातीच्या तपासात तब्बल ४.७५ कोटी रुपयांची मालमत्ता समोर आली आहे.