The missing builder's family was found in Pune  
अहिल्यानगर

बांधकाम व्यावसायिकाचे बेपत्ता कुटुंब पुण्यात सापडले

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : घरगुती वादातून मुलीसह पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार एकाने तोफखाना पोलिस ठाण्यात दिली होती. पतीने त्यांचा सर्वत्र शोध घेतला. पत्नीने आत्महत्या करणार असल्याचा एसएमएस पतीस पाठविल्याने पती घाबरला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
सावेडीतील एका दाम्पत्याचे चार दिवसांपूर्वी कौटुंबिक वादातून भांडण झाले. त्यानंतर महिला आपल्या मुलीसह घरातून गायब झाली. पतीने तिचा जवळच्या नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र, ती कुठेही आढळली नाही. त्यानंतर तिने, आपण आत्महत्या करणार असल्याचा संदेश पतीला पाठविला. त्यामुळे पती घाबरला. त्याने तोफखाना पोलिस ठाण्यात धाव घेतली. तोफखाना पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता, ती पुणे जिल्ह्यात असल्याची खात्री झाली. त्यानुसार तिचा शोध घेण्यात आला. अखेर कुटुंबीयांसह पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत वादळ! उमेदवारीवरून खदखद वाढली; पक्षातच बंडाची चिन्हं

Marathi Language Rule, "मुजोरी चालणार नाही," सरनाईकांनी ठणकावले, रिक्षा अन् टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी ३ महिन्यांची मुदत

भोंदूबाबा मनोहर मामा देत होता 'त्या' मराठी मालिकेला फंडिंग? मराठी अभिनेत्यानेच फोडलं बिंग, पोस्ट व्हायरल

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात उष्णतेचा कडाका, तापमानाचा पार 42.10 अंशावर

Ulhasnagar: धावत्या लोकलमध्ये चाकू हल्ला अन् लुटीचा प्रयत्न, प्रवासी जखमी; आरोपी अटकेत, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT