MLA Ashutosh Kale warned the MSEDCL officials  Sakal
अहिल्यानगर

…तर बदली करून घ्या; आमदार काळेंनी महावितरण अधिकाऱ्यांना सुनावले

सकाळ डिजिटल टीम

कोपरगाव (जि. नाशिक) : विजेबाबत अनेक नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. आपल्या कामात सुधारणा न झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा देऊन, काम करायचे नसेल तर बदली करून घ्या, अशा शब्दांत आमदार आशुतोष काळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

गौतम बँकेच्या सभागृहात आमदार काळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वीजपुरवठ्यातील विविध अडचणींसंदर्भात आढावा घेत, त्यांना चांगलेच फैलावर घेतले. कोपरगाव शहर व मतदारसंघात नागरिकांना विजेबाबतीत अनंत अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. दुरुस्तीची कामे रखडली आहेत. नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी अनेक रोहित्रे मंजूर केली आहेत. मात्र, रोहित्र बसविण्याचे काम घेतलेले ठेकेदार वेळेत काम पूर्ण करीत नसल्यामुळे अडचणींमध्ये भर पडत आहे. अशा ठेकेदारांवर महावितरण कारवाई का करीत नाही, असा सवाल करून, या ठेकेदारांना अभय न देता त्यांना काळ्या यादीत टाका.

शेतकरी व नागरिकांना येत असलेल्या समस्या लवकरात लवकर सोडवा. दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून नवी मंजूर रोहित्रे लवकरात लवकर बसवा. यापुढे नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्या, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम संबंधित अधिकाऱ्यांना भोगावे लागतील, अशी तंबी आमदार काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. यावेळी महावितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता शैलेश मुळे, राहाता विभागाचे उपकार्यकारी अभियंता डी. डी. पाटील, अभियंता शिरीष वाणी, अतिरिक्त. कार्यकारी अभियंता भगवंत खराटे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, जिनिंग-प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, राष्ट्रवादीचे राहाता शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेकदा सांगूनही इथं का राहता? मध्यरात्री खोक्या भोसलेच्या कुटुंबावर हल्ला; कोयता, कुऱ्हाडीने मारहाण, ४ महिला जखमी

IND vs WI, 2nd Test: शुभमन गिल पळत आला अन् सूर मारत चंद्रपॉलचा अफलातून कॅच पकडला, Video एकदा पाहा

Bank Job: महिला शक्तीला बळ देण्यासाठी 'या' सरकारी बँकेचा पुढाकार; फक्त महिलांसाठी भरती प्रक्रिया राबवणार

Satara Crime: धक्कादायक घटना ! 'सासपडेमध्ये अल्पवयीन मुलीचा खून'; सातारा जिल्ह्यात खळबळ, आर्या जखमी अवस्थेत फरशीवर अन्..

Share Market: ५ दिवस... ४५,००० कोटी रुपयांची कमाई, 'या' कंपनीने दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांना दिला सर्वाधिक फायदा

SCROLL FOR NEXT