MLA Jagtap also paid attention to the VRDE issue 
अहिल्यानगर

व्हीआरडीईच्या प्रश्नात आमदार जगताप यांनीही घातले लक्ष

सकाळ वृत्तसेवा

नगर ः लष्काराच्या अखत्यारीतील वाहन संशोधन व विकास संस्था (व्हीआरडीई) या संस्थेला आपण स्थलांतरीत होऊन देणार नाही, असे, आश्‍वासन आमदार संग्राम जगताप यांनी दिले. 

येथील व्हीआरडीई स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे या संस्थेवर अवलंबून असलेल्या सुमारे दोन हजार कुटुंब उध्दवस्त होणार आहे.

या बाबतची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी कर्मचाऱ्यांनी जगताप यांना ही संस्था इतरत्र हलवू देऊ नये, या मागणीचे निवेदन दिलेले आहे.

या प्रसंगी एस. डब्लू पगारे, एम. एस पांढरे, एस. आर. वाघ, एस. एस. अहमद, डी. के. परदेशी, डी. डी. गाडेकर आदी उपस्थित होते. 

जगताप म्हणाले की, व्हीआरडीई ही संरक्षण संस्था दुसरीकडे स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळविण्याबाबत जातीने लक्ष घालून सरकारी दरबारी पाठपुरावा करणार आहे. या प्रश्‍नासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. या संदर्भातचे बोलणे त्यांच्याशी झालेले आहे, असे ते म्हणाले. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

Bajrang Sonawane: बीडमधील खून प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT