MLA Rohit Pawar has expressed concern over the children of sugarcane workers 
अहिल्यानगर

ऊसतोड कामगारांच्या मुलांबाबत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली चिंता; मुंडेंनी लक्ष घालण्याची मागणी

अशोक मुरूमकर

अहमदनगर : साखर कारखाने सुरु झाल्याने सध्या अनेक भागात ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत. सकाळी कडाक्याच्या थंडीत ऊस तोडण्यासाठी कामगार जातात. अनेक कामगारांबरोबर लहान मुलं आहेत. या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न गंभीर आहे. यावर कर्जत जामखेड विधानसभा मतदासंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केली असून यात लक्ष घालावे लागणार असल्याचे त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना सांगितले आहे.

मराठवाड्यातून ऊस तोडणीसाठी दरवर्षी मोठ्याप्रमाणात कामगार येतात. ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठी दरवर्षी साखर कारखान्यावर ‘साखर शाळा’ सुरु केल्या जातात. यामध्ये काही ऊसतोड कामागारांची मुले शाळेत जातात. किंवा ज्या गावात ऊसतोड कामगार आहेत, त्या शाळेत त्यांच्या मुलांची व्यवस्था करण्याबाबतही सरकारने निर्णय घेतला होता. मात्र, दरवर्षी याची अंमलबजावणी झाल्याचे दिसत नाही. यावर्षी तर कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सरकारने शाळाही सुरु केलेल्या नाहीत. त्यातच अद्याप शाळाही सुरु झालेल्या नाहीत. मात्र, ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. या शिक्षणापासून ऊसतोड कामगारांची मुलं वंचित आहेत. याकडे आमदार पवार यांनी लक्ष वेधले आहे. यावर त्यांनी चिंत व्यक्त करत ट्विट केले आहे.

यामध्ये पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना टॅग करत लक्ष घालण्याबाबत सांगितले आहे. यात लक्ष घालतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, माझ्या मतदारसंघातील काही ऊसतोड कामगार कुटुंबांची भेट झाली असता त्यांच्या लहान मुलांना शाळेऐवजी ऊसाच्या फडात पाहून वाईट वाटलं. या मुलांच्या हाती कोयत्याऐवजी लेखणी देण्यासाठी विशेष लक्ष द्यावं लागणार आहे आणि आपण ते द्याल, असा विश्वास आहे.


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT