MLA Rohit Pawar will give jobs to the youth 
अहिल्यानगर

बेरोजगारीची नो चिंता ः आमदार रोहित पवार मिळवून देणार नोकरी

सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोनामुळे संपूर्ण जगच ठप्प झाले आहे. उद्योग-व्यवसाय लॉकडाउनमुळे बंद आहेत. त्यामुळे बहुतांशी लोकांना देशोधडीला लागावे लागले. आतापर्यंत रोजगाराच्या शोधात पुणे, मुंबई किंवा परदेशात जाण्याचा ट्रेंड होता. परंतु कोरोनाने सर्वांनाच गावाकडे पळायला लावले. 
उद्योगचक्रच बंद असल्याने लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाने रोजगार हिसकावून घेतल्याने सैरभैर झाले आहेत. कारण बहुतांशी कंपन्यांनी कॉस्ट कटिंग केलं आहे. काहींचे वेतन अर्धे झाले आहे. लॉकडाउन उठले तरी कंपन्या कामावर घेतीलच याची शाश्‍वती नाही. या चिंतेने तरूणांना ग्रासले आहे. जे मजूर आहेत, त्यांनाही उद्याची चूल कशी पेटवायची याची भ्रांत आहे. 

धान्याचे वाटप 
भारतात कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र हेच चित्र आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी कोरोनाच्या काळात लोकांची घालमेल अनुभवली. ज्यांच्या घरी खायचे वांदे आहेत, त्यांना शिधा पोहोच केला. कांदा-बटाट्यासह भाजीपालाही दिला. दोन्ही मतदारसंघात आतापर्यंत किमान 30 ट्रक धान्य दिले. 

जामखेडला अभिनव प्रयोग 
लोकांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर वाटप केले. गावागावांत औषध फवारणी करून घेतली. जामखेड शहर हॉटस्पॉट झालेले असताना अधिकाऱ्यांच्या बैठका घेत योग्य नियोजन केले आणि थोड्याच दिवसांत शहर कोरोनामुक्त झाले. जामखेड तालुक्‍यात आणखी एक अभिनव प्रयोग त्यांनी राबवला आहे. सध्या पुणे आणि मुंबईहून येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव खेडे गावात होत आहे. हे निरीक्षण समोर आल्यानंतर जामखेड शहरातच सर्वांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बाहेर गावाहून आलेला रूग्ण जामखेड शहरातच थांबेल आणि नंतर त्याला त्याच्या गावात सोडले जाईल. या लोकांच्या जेवणासह सर्व व्यवस्था आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यांना स्वच्छतागृहही पुरवली जाणार आहेत. 

कॅम्पस इंटरव्ह्यूतून संधी 
राज्यात कर्जत-जामखेड आदर्श बनविण्याचे वचन त्यांनी मतदारांना दिले होते. त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. तरूणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी त्यांनी रोजगार मेळावे घेतले. त्यातून गरजवंत विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. आता लॉकडाउनने हजारो तरूणांच्या नोकऱ्या खाल्ल्या आहेत. मतदारसंघात त्यांनी तरूणांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यातून त्यांनी एक उपक्रम राबवला आहे. 

अशी मिळेल नोकरी 
दोन्ही मतदारसंघातील लोकांना ते भ्रमणध्वनीद्वारे आवाहन करीत आहेत. ज्या तरूणांचे रोजगार गेले आहेत. त्यांनी संपर्क कार्यालयात संवाद साधावा, आपला बायोडाटा देऊन नावनोंदणी करता येईल. त्यासाठी कर्जत तालुक्‍यात कर्जत शहर, मिरजगाव, राशीन आणि बारडगाव सुद्रिक येथे संपर्क कार्यालय सुरू केली आहेत. तेथे नोंदणी करता येईल. नावनोंदणी केलेल्या उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित कंपनीकडे त्याचा बायोडाटा पाठविला जाईल. त्या कंपनीला उमेदवारीची माहिती देऊन संधी देण्याचे सूचविले जाणार आहे.

हे काम घरबसल्या होणार असल्याने तरूणांना कोठेही पायपीट करण्याची गरज पडणार नाही. अगदीच अशिक्षित असेल किंवा अंगात कलाकुसर असेल त्याला योग्य मार्ग दाखवून रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमदार पवार यांचा प्रयत्न आहे. राज्यात असा प्रयोग राबविणारा एकमेव मतदारसंघ असावा. त्यासाठी एक फेसबुक पेज तयार केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025, IND vs PAK: पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय संघाचा विचार काय? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

PM Narendra Modi: मणिपूरमधून पंतप्रधान मोदींच्या सुशीला कार्कींना शुभेच्छा; स्पष्ट शब्दात म्हणाले...

Red object in galaxy : अवकाशात दिसले रहस्यमयी लाल ठिपके, पृथ्वीवर होणार गंभीर परिणाम? नेमका विषय काय, जाणून घ्या..

Anurag Thakur : सशक्त भारतासाठी मोदींची पंचसूत्री आवश्‍यक; माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

Latest Marathi News Updates : प्राण गमावलेल्यांच्या कृत्यांबद्दल ऐक्य व्यक्त करण्यासाठी बौद्धनाथ स्तूपाबाहेर मेणबत्ती मार्च

SCROLL FOR NEXT