court
court esakal
अहमदनगर

अहमदनगर : मोकाटेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : मागासवर्गीय महिलेचे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेला आरोपी गोविंद खंडू मोकाटे (वय 49) यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती व्ही. के. जाधव व संदीपकुमार मोरे यांच्या समोर या अपिलावर सुनावणी झाली.

पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे यांनी महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आरोपीवर ऍट्रॉसिटीचे कलम देखील लावण्यात आलेले आहे. आरोपी मोकाटे यांनी जामीन मिळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यावर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अपिल दाखल केले होते. महिलेवर झालेल्या अत्याचाराचा गुन्हा गंभीर असून, या प्रकरणाचा तपास अजून पुर्ण झालेला नाही. आरोपी मोकाटे राजकीय व्यक्ती असल्याने तपासात बाधा आणू शकतो, साक्षी-पुरावे छेडछाड करू शकतो. या परिस्थितीमध्ये त्याला जामीन देणे योग्य नसल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन उच्च न्यायालयाचे गोविंद मोकाटे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. पीडित महिलेच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ व्ही. एच. दिघे यांनी बाजू मांडली. सरकारतर्फे एस. जी. सलगरे यांनी बाजू मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: भाजप -एनडीए 2-0 ने आघाडीवर; कोल्हापुरात पीएम मोदांचा विरोधकांवर हल्लाबोल

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला तगडा झटका! खलीलने आक्रमक खेळणाऱ्या सूर्यकुमारचा अडथळा केला दूर

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

SCROLL FOR NEXT