Rain Water sakal
अहिल्यानगर

Monsoon : पाऊस फिरुनि आला... जिल्हा चिंब ओला...

गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा मनावर घेतलंय. कालपासून आषाढसरी बरसत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा मनावर घेतलंय. कालपासून आषाढसरी बरसत आहेत. जिल्हाभर पाऊस असल्याने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. हंगामाच्या सुरूवातीलाच मृग सरी बरसल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरा केला होता. उगवण झालेल्या बाजरी, तूर, मका, उडीद, कपाशीला या पावसाने संजीवनी मिळाली आहे.

कालपासून पाऊस दीर्घ विश्रांतीनंतर बरसत आहे. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार धारा बरसत आहेत. जिल्ह्यात आजही पावसाने हजेरी लावली. जामखेड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तेथे ७७ मिलीमीटरची नोंद आहे. पाथर्डी तालुक्यातील आकडेही लक्षणीय आहेत. हे दोन्ही तालुके दुष्काळी असल्याने तेथील शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे.

अल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरा केला होता. त्याची चांगली उगवण झाली होती. खरिपातील पिके तरारली होती. मात्र, पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. या आठवड्यात पाऊस झाला नसता तर खरिपातील पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली होती.

परंतु पावसाने जिल्ह्यात विस्तृत प्रमाणात हजेरी लावल्याने या हंगामाला तूर्त जीवदान मिळाले आहे. जून महिन्यात सरकारी २०० मिलीमीटर पाऊस झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात आशादायक चित्र निर्माण झाले आहे. या महिन्यात आजअखेर ५६ टक्के पाऊस झाल्याचे जिल्ह्यातील महसूल यंत्रणेतर्फे सांगण्यात आले.

जिल्ह्यात खरिपाची पेरणी झाली असली तरी कोणतीही नदी वाहती झाली नाही. जिल्ह्याची लाइफलाइन समजली जाणारी मुळा आणि भंडारदरा ही धरणात नवीन आवक सुरू झाली आहे. भंडारदरा ३० टक्के तर मुळा धरणसाठा अद्यापि गाळातच आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने मुळा नदी वाहती झाली आहे. इतर नद्या कोरड्याठाक आहेत. पाणीपातळी वाढण्यासाठी बळीराजाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT