Movement of Waghya-Murali Parishad in Newash
Movement of Waghya-Murali Parishad in Newash 
अहमदनगर

वाघ्या-मुरळी परिषदेचे नेवाशात जागरण गोंधळ आंदोलन

सुनील गर्जे

नेवासे: "येळकोट... येळकोट... जय मल्हार...'चा गजर करीत, "वाघ्या-मुरळी यांना पेन्शन सुरू करा,' यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. 8) महाराष्ट्र राज्य वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे नेवासे येथील खोलेश्वर गणपती चौकात जागरण-गोंधळ घालून आंदोलन केले. 

नेवाशाचे तहसीलदार रूपेश सुराणा यांना वाघ्या-मुरळी लोककलावंतांतर्फे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की सर्व लोककलावंतांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा, लोककलेला सरकारदरबारी अधिकृत मान्यता मिळवून नोंदणी करावी, कलावंतांच्या निवासासाठी शासनाकडून जमीन, घर स्वरूपात विशेष योजना मंजूर करण्यात यावी, वाघ्या-मुरळी यांना पेन्शन योजना सुरू करण्यात यावी व महाराष्ट्रातील लोककलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. 

सामाजिक अंतराचे पालन करत झालेल्या या आंदोलनात वाघ्या-मुरळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष भास्कर मासाळ, तालुकाध्यक्ष लक्ष्मण नजन, गंगापूर तालुकाध्यक्ष अनिल दुधे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष एकनाथ मासाळ, सर्जेराव बेडके, सागर मासाळ, सोमनाथ नजन, बाबा वाघ, संतोष पाचे, संतोष नळघे, गोपाळ नजन, आकाश पाचे, सपना मुरळी आदी कलावंत सहभागी झाले होते. 

उदरनिर्वाहासाठी निधी द्या : नजन 
लोककलावंतांची कोरोना महामारीत मोठी उपासमार होत असल्याने, उदरनिर्वाहासाठी अनुदान स्वरूपात निधी देण्यात यावा, तसेच सरकारने आमच्या मागण्या सहानुभूतीने सोडवाव्यात, अशी मागणी वाघ्या-मुरळी परिषदेचे नेवासे तालुकाध्यक्ष लक्ष्मण नजन यांनी केली. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT