MP Dr. Sujay Vikhe Patil said that privatization of Tanpure will not be allowed 
अहिल्यानगर

जोपर्यंत माझ्या ताब्यात आहे, तोपर्यंत 'तनपुरे'चे खासगीकरण होऊ देणार नाही

विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : राज्यातील सहकारी साखर कारखाने बंद करुन, 25 कारखाने विकत घेणारे एकच कुटुंब आहे. परंतु, जोपर्यंत माझ्या ताब्यात आहे, तोपर्यंत तनपुरे कारखान्याचे खासगीकरण होऊ देणार नाही. निवडणुकीत परिवर्तन मंडळाला सभासद शेतकऱ्यांनी साथ द्यावी, असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. 

डॉ. बाबूराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या ऑनलाइन वार्षिक सभेत खासदार डॉ. विखे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे होते. माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, शिवाजी सोनवणे, कार्यकारी संचालक भाऊसाहेब सरोदे उपस्थित होते. सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. 

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, तनपुरे कारखाना चालविण्यासाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची मदत लाभली. आज दोन लाख टन गाळप झाले. त्याचा आनंद आहे. नेतृत्व असेल, तर कामगारांची साथ लाभते, हे सिद्ध झाले. 30 एप्रिलपर्यंत हंगाम चालेल. 

अध्यक्ष ढोकणे म्हणाले, जिल्हा बॅंकेच्या कर्जाचे दहा कोटी रुपये व एफआरपी दिला. प्रतिदिन साडेतीन हजार टन ऊस गाळप सुरू आहे. प्रवरा कारखान्याच्या ऊस तोडणी यंत्रणेमुळे हंगाम यशस्वी होत आहे. कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुरेश वाबळे, बाबा देशमुख, अनिल शिरसाठ, वसंत कोळसे, अण्णासाहेब बाचकर यांनी चर्चेत भाग घेतला. संचालक महेश पाटील यांनी आभार मानले. 

सुपारी घेणाऱ्यांनी शिकवू नये 

मागील संचालक मंडळाने थकविलेला बारा कोटी रुपयांचा एफआरपी दिला. त्यामुळे कामगारांची देणी राहिली. ज्यांनी उसाचे टिपरू दिले नाही, त्यांनी उसापोटी लाखो रुपयांची उचल घेऊन ती भरलीच नाही. अशा सुपारी घेऊन बोलणाऱ्यांनी शहाणपणा शिकवू नये, असेही डॉ. विखे पाटील यांनी ठणकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad North Politics: राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश; हनुमानवाडी, भवानवाडीत बाळासाहेब पाटील गटाला धक्का..

Sindhudurg Heritage : दोनशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन दोन स्मारके तोडली, मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळची घटना

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघावरून महायुतीत धुसफुस

पेशव्यांना होतं पैठणीचं आकर्षण! सोळा हात लांब, तीन किलो वजन; शुद्ध सोन्याच्या जरीची पेशवेकालीन पैठणी कशी होती?

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

SCROLL FOR NEXT