pritam munde Sakal
अहिल्यानगर

'मंत्रिपदाच्या शर्यतीत मी कधी नव्हतेच' - खासदार प्रीतम मुंडे

सकाळ डिजिटल टीम


पाथर्डी (जि. अहमदनगर) : मंत्रिपदाच्या शर्यतीत मी कधीच नव्हते, त्यामुळे मला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून तुम्ही नाराज होऊ नका. माझ्या दृष्टीने तुमचे आशीर्वाद महत्त्वाचे असल्याची भावना खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली.

भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी आमदार मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, गोकुळ दौंड, अशोक गर्जे, बीड जिल्हा परिषदेचे सदस्य रामराव खेडकर, विजय गोल्हार उपस्थित होते. मुंडे म्हणाल्या, पाथर्डी तालुक्यास दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे मावशी म्हणत. त्या नात्याने पाथर्डी माझी आजी आहे. तुमच्याकडून मला काकणभर जास्त मायेची गरज आहे. तुमचे आशीर्वाद मला मतदानातून मिळत नाही, ही खंत आहे. या तालुक्याचा समावेश जर बीड लोकसभा मतदारसंघात झाला असता, तर मला अधिक आनंद झाला असता. गर्जे यांनी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवावेत. प्रास्ताविक अमोल गर्जे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड तर आभार मुकुंद गर्जे यांनी मानले.

दिल्ली अभी बाकी है

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्वाभिमानाने कसे जगायचे, याची शिकवण आपल्या सर्वांना दिली आहे. त्यांची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. राजकारणात आपण अपार कष्ट घेणार असून, ये तो बस झाकी है, दिल्ली अभी बाकी है, असे खासदार प्रीतम मुंडे शेवटी म्हणाल्या.

बीड जिल्हा राजकारणात सर्वांना पुरून उरणारा जिल्हा आहे, आपला देश कृषिप्रधान देश असला तरीही बीड जिल्ह्यात राजकारण हा पहिला, पत्रकारिता हा दुसरा तर सल्ला देणे हा तिसरा धंदा असून येथे सल्ले चांगले मिळत असून हा जिल्हा माझ्यासाठी खासच आहे असे मुंडे म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

सायनमध्ये डॉक्टरचा हायव्होल्टेज ड्रामा! नोकरीवरून काढल्याच्या रागात थेट टॉवरवर चढला अन्...; अंगावर काटा आणणारा Video Viral

SCROLL FOR NEXT